Thursday, May 14, 2020

ना. धनंजय मुंडे व वाल्मिकअण्णा कराड यांच्या माध्यमातून 35 वर्षाचा प्रभाग 7चा पाणी प्रश्न सुटला .

* नगरसेविका सफिया पटेल व युवा नेते   इस्माईल पटेल यांचा पुढाकार .

परळी वैजनाथ;- (प्रतिनिधी)
शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील ३५ वर्षांपासून परिसरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या. याच पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून गटनेते वाल्मीक कराड यांच्या नेतृत्वाखाली नवीन पाईप लाईन घेऊन नागरिकांची समस्या सोडवली. धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ७ मधील परिसरातील पाण्याचा प्रश्न मिटला असून नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. प्रभाग क्रमांक ७ मधील  नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी या भागातील नगरसेविका सफिया इस्माईल पटेल व पाणीपुरवठा सभापती यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.  
 परळी शहरातील  प्रभाग क्रमांक ७ मधील ३५ वर्षांपासून परिसरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या . सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत असून उन्हाची दाहकता प्रचंड वाढत असल्याने भागात पाण्याचा प्रश्न जटील बनत चालला आहे. परिसरातील नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. या भागात नवीन पाईप लाईन टाकावी  अशी मागणी या भागातील नागरिकांनी  नगरसेविका सफिया इस्माईल पटेल व युवा नेते  स्माईल पटेल  यांनी  यांच्याशी संपर्क करून केली होती. त्यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे व गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या संपर्क साधत पाणीप्रश्न सुटावा यासाठी पाठपुरावा केला होता.त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तात्काळ या भागातील पाणी प्रश्न मिटला पाहिजे. असे सांगितले  व सदरील पाणी प्रश्न सोडविला .  देशात सध्या सर्वत्र कोरोना संकट उभे असतांना पाणी टंचाई निर्माण झाली होती. लाँकडाऊन असल्यामुळे  पाणी आणायचे कसे असा प्रश्न नागरिकांना पडला होता. याच पार्श्वभूमीवर ना. धनंजय मुंडे यांच्याकडे या भागातील पाणी प्रश्न सोडवावा अशी  मागणी केली असता त्यांनी तात्काळ जनतेसाठी पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविला न.प. गट नेते वाल्मीक अण्णा कराड यांनी विलंब न लावता लगेच या भागात नवीन पाईप लाईन  देण्यात आली यालाच म्हणतात जनतेची काळजी घेणारे  खरे.पालकमंत्री जनतेने धनंजय मुंडे साहेब व वाल्मीक अण्णा कराड जनतेने यांचे जाहीर आभार मानले.

No comments:

Post a Comment