मुंबई, दि. २९ –; बंधपत्रीत (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करणयाचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे व त्यांचे मानधन समान करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जाहीर केला. यामुळे कोरोना लढाईला बळ मिळणार असून डॉक्टर्सनासुध्दा प्रोत्साहन मिळणार आहे.
वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना ६० हजार ऐवजी ७५ हजार, आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना ७० हजार ऐवजी ८५ हजार, इतर भागातील एम बी बी एस डॉक्टर्सना ५५ हजार ऐवजी ७० हजार, इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना ६५ हजार ऐवजी ८० हजार मानधन देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले आहे.
No comments:
Post a Comment