Sunday, May 10, 2020

ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.

*महाआरती, अन्नदान,  मास्क, टरबुज व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

परळी (प्रतिनिधी)
अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांचा वाढदिवस संगम येथील लॉर्ड बुद्धा मित्र मंडळाच्या वतिने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
लॉर्ड बुद्धा मित्र मंडळाच्या वतिने  अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून गावातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. तसेच संगम गावात कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी मास्कचे वाटप तसेच संगम गावात विविध ठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले.संगमचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर व बौद्ध विहार समोर वृक्षारोपणही करण्यात आले तर दिंद्रुड येथे बाळासाहेब डांगे यांच्या माध्यमातून अ.भा.वारकरी मंडळाच्या वतिने टरबुजाचे वाटप करण्यात आले. ग्रामदैवत श्री कपिलेश्वर व श्री हनुमान मंदिरात कोकाटे महाराजांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी महाआरती करण्यात आली.
अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांचा राज्यभरात दांडगा जनसंपर्क असून समाजातील डॉक्टर, वकील, पत्रकार महाराज मंडळी, किर्तनकार यांनी दुरध्वनीवरून कोकाटे महाराजांचे अभिनंदन केले. आगळया वेगळया वाढदिवस कार्यक्रमामुळे अनेकांनी संगम वासियांचे व कोकाटे महाराजांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment