गेवराई ;--(प्रतिनिधी )
गेवराई तालुक्यातील कोट्यावधी रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणी मूळ फिर्यादी असलेल्या ना. तहसीलदार अशोक भंडारे यास अटक करण्यात आली आहे.
गेवराई तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्याच्या गोदामावर पोलिसांनी छापा मारून सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्य घोटाळा उघडकीस आणला होता. याप्रकरणी नायब तहसीलदार अशोक भंडारे याच्या फिर्यादीवरून अरुण मस्के विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. यात तपासादरम्यान एका गोदामपालला अटक करण्यात आली होती. मात्र गुन्ह्याची पाळेमुळे पुरवठा विभागात असल्याचे स्पष्ट झाले होते. विशेष तपास पथकाने या प्रकरणात फिर्यादी असलेल्या नायब तहसीलदार अशोक भंडारे ची कसून चौकशी केली होती. अखेर शुक्रवारी याप्रकरणात त्याला आरोपी करण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. विशेष तपास पथकाचे प्रमुख तथा पोलीस उपाधीक्षक स्वप्नील राठोड यांनी ही माहिती दिली. या अटकेने पुरवठा विभागात खळबळ माजली आहे.
No comments:
Post a Comment