Tuesday, May 12, 2020

शासकीय गोदामातील धान्य चोरी उघडकीस आणल्याच्या रागातून.पत्रकार संभाजी मुंडे यांच्या घरावर हल्ला, चाकू, धारदार शस्त्राचा वापर, तिघे जखमी.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शासकीय गोदामातील धान्य चोरी उघडकीस आणल्याच्या रागातून दहा ते पंधरा जणांनी पत्रकार पञकार संघाचे अध्यक्ष संभाजी मुंडे यांच्या घरावर धारदार शस्त्रासह हल्ला हल्ला चढवला. यात संभाजी मुंडे, त्यांचा मुलगा विष्णू, पत्नी पार्वती यांना जबर मारहाण करण्यात आली असुन दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सायंकाळी आठ वाजण्याचे सुमारास नाथ टॉकीज रोडवर असलेल्या निवासस्थानी घटना घडली. या घटनेमुळे बीड जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.
या खळबळजनक घटनेची माहिती अशी की, शहरातील अमर मैदानाजवळ शासकीय गोदाम आहे. या गोदामातील धान्य काही चोरटे चोरी करीत होते. ही बाब याच भागात राहणारे पत्रकार संभाजी मुंडे यांच्या लक्षात आली. त्यांनी प्रारंभी चोरी करणाऱ्या तरूणांच्या पालकांना सांगितले. पण चोरी थांबत नसल्याने मुंडे यांनी तहसील आणि पोलीस प्रशासनाला माहिती दिली. ही बाब संबंधित चोरी कर्णधारांच्या लक्षात येताच चोरी करणाऱ्या टोळक्याने संभाजी मुंडे यांच्या घरावर हल्ला चढविला.
आज दिनांक 11 मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दहा ते पंधरा जणांच्या या टोळक्याने चाकू, धारदार शस्त्र आणि दगडाने संभाजी मुंडे यांच्या घरावर हल्ला केला. शिवीगाळ करीत या टोळक्याने संभाजी मुंडे, मुलगा विष्णू आणि पत्नी पार्वती यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात संभाजी मुंडे हे बेशुद्ध होईपर्यंत त्यांना मारहाण केली, मुलगा विष्णू आणि पत्नी पार्वती यानांही जबर मारहाण करण्यात आली. यात संभाजी मुंडे यांच्या अंगावर ठिकठिकाणी चाकुचे वार करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या आहेत तर मुलालाही जबर मार लागला आहे. या भागातील नागरीकांनी सोडवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान घटना समजताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनीच संभाजी मुंडे व जखमींना उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे तातडीने उपचार करण्यात आले तर विष्णू मुंडे यांच्या डोक्यात मार लागल्याने त्याला खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment