Thursday, May 14, 2020

न्यु आदर्श बहुउद्येशीय संस्था व अमोल घोटेकर यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजीत राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत आदित्य आवारी प्रथम .


न्यु आदर्श बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल घोटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत राजुरा येथील युवा कवी आदित्य आवारी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला असून त्यांना ३ हजार रुपये रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आदित्य आवारी हे वयाच्या १७ व्या वर्षातच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापर्यंत पोहोचले असून, दमदार लेखणीतून ते शेतकर्‍यांचे दुःख कवितेतून मांडत असतात. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक यवतमाळ येथील गझलकार आनंद देवगडे यांनी पटकाविला असून, तृतीय क्रमांक पुणे येथील युवा कवी वृषभ बोरीकर यांनी पटकाविला आहे.

No comments:

Post a Comment