Tuesday, September 30, 2025

आष्टी पंचायत समितीला तीन वर्षांतच गळती. ३ कोटी ९२ लाख खर्च करूनही 'गळका' कारभार.


आष्टी (प्रतिनिधी) : आष्टी पंचायत समितीच्या इमारतीवर अवघ्या तीन वर्षांपूर्वी यशोदिप कॉन्ट्रक्शनने तब्बल ३ कोटी ९२ लाख रुपये खर्चून नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आली होते. मात्र, पावसाळा सुरू होताच इमारतीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

इमारतीच्या छतावरून सतत पाणी टिपकत असल्याने कार्यालयीन कागदपत्रे भिजून नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांना कामानिमित्त कार्यालयात थांबणे कठीण झाले असून कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, "सार्वजनिक निधी खर्च करून सुद्धा दर्जेदार काम होत नाही. फक्त नावाला काम होऊन प्रत्यक्षात गळती थांबत नसेल तर हा निधी पाण्यातच जातो.त्यामुळे जबाबदार गुत्तेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

गुत्तेदाराला काळ्या यादीत टाका.

दर्जेदार काम होत नसल्यास सार्वजनिक निधी थेट पाण्यात गेल्यामुळे अशा निष्कृट काम करणाऱ्या गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकावे व जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

दुरूस्तीसाठी पत्र दिले.

याबाबत आष्टी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने यांना विचारले असता ते म्हणाले की, इमारत गळत आहे. संबंधित गुत्तेदाराला याप्रकरणी दुरूस्तीसाठी पत्र देण्यात येईल असे सांगितले.

आ.संदीप क्षीरसागर यांची राज्य शासना च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यपदी नियुक्ती.


बीड (प्रतिनिधी) बीड विधानसभा मतदार संघांचे आमदार संदीप क्षीरसागर यांची राज्य शासनाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट )सदस्यपदि नियुक्ती झाली आहे. आ क्षीरसागर यांनी आज या नियुक्तीनंतर विदयापीठाच्या बैठकीत सहभाग घेतला.

मराठवाड्यातील प्रतीथयश अशा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठवर सिनेट मेंबर ची नियुक्ती राज्यशासनाच्या वतीने केली जाते.विधानसभा प्रतिनिधी म्हणून त्यांची शासनाने ही नियुक्ती केली आहेया नियुक्तीबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होतं आहे. आ क्षीरसागर यांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे विदयापीठात जाऊन बैठकीला हजेरी लावली. या माध्यमातून आपण मराठवाड्याच्या शैक्षणिक चळवळीला न्याय देऊन शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करू अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

बीड जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर. परळी अनुसूचित जातीसाठी राखीव.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये बीड पंचायत समितीचे सभापती पद ओबीसीसाठी राखीव झाले आहे. उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी आणि प्रभोदय मुळे यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली.

बीड जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे आरक्षण काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत आयोजित करण्यात आली होती.

जिल्ह्यातील अकरा पंचायत समितीच्या सभापतींचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.

पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत खालीलप्रमाणे :-

  1. बीड – OBC
  2. गेवराई – OBC महिला
  3. आष्टी – OPEN महिला
  4. शिरूर – OPEN महिला
  5. पाटोदा – OPEN
  6. परळी – अनुसूचित जाती (SC)
  7. वडवणी – OPEN
  8. धारूर – OBC महिला
  9. माजलगाव – OPEN महिला
  10. अंबेजोगाई – OPEN महिला
  11. कैज – OPEN

Saturday, September 27, 2025

भूतदया सर्व श्रेष्ठ समाजसेवा. पुराच्या पाण्यात अडकलेल्या मुक्या जीवाची सुखरूप सुटका.


बीड (प्रतिनिधी) गेल्या अनेक दिवसां पासून पावसामुळे महाराष्ट्र सह बीड जिल्ह्यात हाहाकार चालू आहे यामुळे खूप मोठी जिवित हानी पशुपालन हानी पिकांचे नुकसान इत्यादी अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे आशा परिस्थितीत सर्वानी सावध व काळजी घेणे आवश्यक आहे.
बीडमध्ये आज झालेल्या पावसामुळे कर्परा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले या पाण्यात पुलाखाली काही गायी अडकल्या होत्या त्यांना बाहेर काढण्यासाठी माजी न.प.सभापती समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते विलासभाऊ विधाते प्रजापत्रचे उपसंपादक समीर लव्हारे, डाॅ.गणेश काळे यांच्या तत्परतेमुळे व नगरपालिका अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना मुळे रात्रभर पुराच्या पाण्यात अडकलेल्या मुक्या जीवाची सुखरूप सुटका केली.
सद्य स्थिती पहाता आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आणि नगरपालिका प्रशासन सज्ज आहेच तरी नदी पात्रातील आणि परिसरातील नागरीकांनी सर्तक राहावे काही आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास फोन करावा असे आवाहन विलासभाऊ विधाते यांनी केले.

Friday, September 26, 2025

मान्सून अपडेट. मान्सून पुन्हा सुसाट धोक्याची घंटा. सावधानी बाळगा.काळजी घ्या.

कांतीकारी साथी *-  मान्सून अपडेट दि. 27,28, 29 सप्टेंबर 2025  हाय_रेडअलर्ट 23 सप्टेंबर 2025 ला विशाखापट्टनम  मध्ये तयार झालेला कमीदाब पट्टा महाराष्ट्रातुन मार्गक्रमण करत असल्याने पुढील  गावे , तालुके , जिल्हे यांनी सतर्कता बाळगावी ... पाऊस मुसळधार  ते ढगफुटी राहाण्याची शक्यता आहेत ...
पंढरपुर,  सोलापुर, तुळजापुर,बार्शी, पेट, धाराशिव ,लातुर, केज , परळी, उदगीर, माजलगाव, सेलु , नांदेड , उमरखेड, अकलुज,  दापोली, खेड, प्रतापगड, गोरेगाव, दिवाघर , मुरूड, अलिबाग, पेण, लवासा , भोर, वाई, फलटण , बारामती, अंबड, गेवराई, पाथर्डी,  पैठण, बीड, जिंतुर, परभणी, पुर्णा, गंगाखेड,  ठाणे, पनवेल, नेरळ, कामशेत , चाकण, जुन्नर, शिरूर , अळकुटी ,30 सप्टेंबर ला कमीदाब पट्टा  गुजरात समोरील पोरबंदर व वेरावळ समोर अरबीसमुद्रात विसावत  आहेत. 
 3 ऑक्टोंबर  2025 चा नविन कमीदाब पट्टा हि महाराष्ट्रातुनच  मार्गक्रमण करत असल्याने. त्या नंतर हि पाऊसाची परत शक्यता राहिलच.   

शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची मदत दिवाळीपूर्वी द्या.तसेच पशुधन आणि दुकानदारांचेही मोठे नुकसान झाले आहे, त्यांना देखील मदत द्यावी.- आ.जयंत पाटील


आष्टी (प्रतिनिधी) : आष्टीसह मराठवाड्यात, सोलापूरमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणा वर पाऊस झाल्याने अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने नुकसानग्रस्तांना दिवाळीपूर्वी एकरी ५० हजार रूपये ठोस मदत द्यावी, अशी मागणी माजी मंत्री जयंत पाटील यांनी कडा येथील नुकसानीची पाहणी करताना केली.

आष्टी तालुक्यातील अनेक गावात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी कडा, चोभानिमगाव, शिराळ या नुकसानग्रस्त गावांना माजीमंत्री जयंत पाटील यांनी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रूपये तर खरडून गेलेल्या जमीनीसाठी ३० हजार, पशुधनासाठी ६० ते ७० हजार रूपये अशी भरीव मदत द्यावी. तसेच दुकानदारांचे देखील मोठे नुकसान झाले असून त्यांना देखील त्वरीत नुकसान भरपाई मिळावी. सरकारकडे खूप पैसा आहे, असे आम्हाला वाटते. नुकसानग्रस्तांना ही मदत दिवाळीपूर्वी द्यावी, अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली. तसेच कर्जमाफीच्या जुन्या मागणीसाठी अधिवेशनात पुन्हा आवाज उठवणार असल्याचे ही पाटील यांनी सांगितले.

यावेळी बीडचे खा. बजरंग सोनवणे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, संगीता ठोंबरे, सुशीला मोराळे, राजे साहेब देशमुख, आणासाहेब चौधरी, सतीश शिंदे, राम खाडे, सुनील नाथ, अमोल तरटे, शेख रिझवान, संजय थोरवे, अशोक पोकळे, जगनाथ ढोबळे, राहुल काकडे यांच्यासह तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

केज तालुक्यातील मस्साजोग शिवारातून 30 लाखांचा गुटखा जप्त.बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.


केज (प्रतिनिधी): पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांच्या आदेशानुसार बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या पथकाने राज्य शासनाने शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान मस्साजोग शिवारात छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 30 लाख 46 हजार 227 रुपयाचा गुटखा व सुगंधी सुपारीचा साठा आणि 4 लाख रुपये किंमतीची गाडी असा एकूण 34 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 

य प्रकरणी बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अनंत मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, रोहित आसाराम देशमुख ( 35 वर्ष रा. मस्साजोग), साहेबराव लिंबा आंधळे ( 45 वर्ष रा.आंधळ्याचीवाडी) या दोन्ही आरोपीविरुद्ध  केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हे करीत आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात गुटखा व सुगंधी तंबाखूची अवैध विक्री रोखण्यास मोठा हातभार लागणार आहे.

यांच्या पथकाने केली ही कारवाई.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली  बीडच्या गुन्हा  शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, व त्यांचा पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस अंमलदार अनंत मस्के, विकास राठोड, सोमनाथ गायकवाड, अंकुश वरपे, राहुल शिंदे, राख, अश्फाक सय्यद, मनोज परजने, नितीन वडमारे, सिद्धार्थ मांजरे, सुनील राठोड यांच्या पथकाने  केली.

Thursday, September 25, 2025

आईच्या डोळ्यासमोर आदित्य वाहून गेला हतबल आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश.


बीड (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात कधी कोरडा दुष्काळ पडतो तर कधी ओला दुष्काळ पडतो. अस्मानी संकटात या जिल्ह्यातील नागरिक सतत होरपळत आहेत. मात्र, या वेळेस पावसाने कहरच केला आहे. एका बाजूला शेतातील पिकांचं नुकसान झालं, घरं पडली, घरात पाणी शिरलं, धान्य वाहून गेले, शाळेची पुस्तकं वह्या वाहून गेल्या, जनावरे वाहून गेली, पुल वाहून गेले, शेतातील माती वाहून गेली आणि या प्रवाहात बीड तालुक्यातील पिंपळवाडी गावचा एक 10 वर्षाचा शाळकरी मुलगा देखील वाहून गेला. बिंदुसरा नदीला पूर आला आणि होत्याच नव्हतं झालं.

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील पिंपळवाडी येथील रहिवासी असलेला दहा वर्षांचा आदित्य उत्तम कळसाने हा बिंदुसरा नदीच्या पुरात वाहून गेला. ही घटना त्याच्या आई समोरच घडली आणि ती आपल्या लेकराला वाचवण्यासाठी काहीही करु शकली नाही. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

आदित्य हा गावातील जिल्हापरिषद शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत होता. शाळेला सुट्टी होती म्हणून आदित्यने त्याच्या आईकडे शेतात जाण्याचा हट्ट केला. आईसोबत मका काढत असताना अचानक ढगफुटी सदृश पाऊस सुरू झाला, यावेळी शेतात काम करण्यासाठी फक्त महिला होत्या. चरण्यासाठी जनावरं सोडली होती, ती बांधण्यासाठी आदित्यच्या आईने त्याचा हात सोडला आणि जनावरे बांधू लागली तेवढ्यात बिंदुसरा नदीला मोठा पूर आला आणि त्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात आदित्य वाहून गेला.आईच्या डोळ्यासमोर आदित्य वाहून गेला, पण ती काहीच करू शकत नव्हती. हतबल आई धावपळ करत होती मात्र मदतीसाठी कोणी पुरुष परिसरात नव्हते. डोळ्यासमोर पोटचा पोरगा पाहून जात होता आणि त्याची आई काहीच करू शकत नव्हती. बघता- बघता मुलगा डोळ्यासमोरून नाहीसा झाला. तब्बल एक तास त्याची शोधाशोध केली आणि शेवटी त्याचा मृतदेह सापडून आला. हे पाहताच त्याच्या आईच्या काळजाचा ठोका चुकला.

गावातील ग्रामस्थांनी त्याचा तासभर पाण्यात शोध घेतला त्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेने कळसाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बीडमध्ये झालेल्या पावसात त्यांना आपल्या मुलाला गमवावे लागले. आदित्य गेल्यापासून या घरात चूल देखील पेटली नाही. आदित्यची आई निशब्द आहे. आदित्यला एक मोठा भाऊ आहे तो देखील त्याच जिल्हापरिषद शाळेत पाचवित शिक्षण शिकत आहे. आदित्य हा घरात सर्वात लहान होता. आता त्याच्या पश्चात त्याचे वडील, आई आज्जी, आजोबा, भाऊ असा परिवार आहे. खांद्यावर खेळवलेल्या नातवाला गमवावं लागल्याने आदित्यच्या आजीला आणि आईला पाहून गावकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आलं.

माने कॉम्प्लेक्स भागात युवकाचा धारदार शस्त्राने वार करत खुन !


बीड (प्रतिनिधी)शहरातील माने कॉम्प्लेक्स भागात एका युवकाचा धारदार शस्त्राने वार करत मर्डर करण्यात आला. यश ढाका असे मृत तरुणाचे नाव आहे. पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा आहे.

माने कॉम्प्लेक्स भागात असलेल्या पान टपरी समोर रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी यश ढाका या युवकांवर प्राणघातक हल्ला केला. धारदार शस्त्राचे वार झाल्याने यश जागीच कोसळले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मर्डर कोणत्या कारणावरून झाला याबाबत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

Wednesday, September 24, 2025

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित जिल्हा स्तरीय गणेशोत्सव स्पर्धेचे पुरस्कार जाहीर.

बीड (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य आणि जिल्हास्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत बीड जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार धारूर, द्वितीय अंबाजोगाई आणि तृतीय पुरस्कार बीडच्या राष्ट्रीय गणेश मंडळास जाहीर झाला आहे.
राज्य सरकारने गणेशोत्सव काळात गणेश मंडळासाठी विविध पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये सांस्कृतिक, ऐतिहासिक, आरोग्य, सामाजिक जनजागृती या विषयावर देखावे सादर करणाऱ्या मंडळाना पुरस्कार जाहीर केले होते.
जिल्हा आणि राज्य पातळीवर ही स्पर्धा आयोजित केली होती. बीड जिल्ह्यातून धारूर येथील जय किसान गणेश मंडळाला प्रथम पुरस्कार पन्नास हजार रुपये, द्वितीय पुरस्कार चाळीस हजार रुपये अंबाजोगाई च्या सरस्वती गणेश मंडळास आणि तृतीय तीस हजार रुपयांचा पुरस्कार बीडच्या राष्ट्रीय गणेश मंडळास जाहीर झाला आहे.

१०० गुन्हे असलेला अट्टल गुन्हेगार लाल्या भोसले’ पोलिसांच्या जाळ्यात.आष्टी पोलिसांच्या कामगिरीचे पोलिस अधीक्षकांकडून कौतुक!


आष्टी (प्रतिनिधी): पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, सांगलीसह अनेक जिल्ह्यात घरफोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला अट्टल गुन्हेगार चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत जागा बदलून राहत होता.आष्टी पोलिसांनी मंगळवारी रात्री दहाच्या दरम्यान ठाणे हद्दीतील एका वस्तीवर सापळा रचून झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या.सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले रा.बेलगाव ता.कर्जत जि.अहिल्यानगर असे त्याचे नाव आहे.आष्टी पोलिसांच्या कामगिरीचे पोलिस अधीक्षकांकडून कौतुक होत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बेलगाव येथील सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले याच्यावर बीड,पुणे,सोलापूर, अहिल्यानगर, सांगली,आष्टी यासह अनेक ठिकाणी घोरफोड्या केल्याचे गुन्हे दाखल आहेत.चार वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत वास्तव बदलून राहत होता.आष्टी पोलिस देखील त्याच्या मागावर होतो.मंगळवारी रात्री तो आष्टी ठाणे हद्दीतील आंधळेवाडी येथील पारधीवस्तीवर आल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी फौजफाट्यासह सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या.

ही कामगिरी आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे,पोलीस हवालदार प्रवीण क्षीरसागर, मजरूद्दीन सय्यद, विकास जाधव, अशोक तांबे,बब्रुवाण वाणी,नागेश लोमटे,संतोष दराडे,सजगणे,होमगार्ड यांनी केली.

गुन्ह्य़ांची हॅटट्रिक तरीही देत होता गुंगारा.

अट्टल दरोडेखोर 'आटल्या' भोसले याचा 'लाल्या' हा मोठा भाऊ असून घरफोडीसह लहानमोठे विविध पोलिस ठाण्यात त्यांच्यावर जवळपास १०० गुन्हे दाखल असल्याचे बोलले जात आहे.त्याला पकडल्याने आष्टी पोलिसांचे आता कौतुक होत असून पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी आष्टी पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे.

क्षीरसागर, सय्यद जोडगोळीचे मोठे यश.

आष्टी पोलिस ठाणे हद्दीतील पाहिजे,फरारी व इतर घटनेतील आरोपीचा छडा लावून त्यांना पकडण्यात ठाण्यातील पोलीस हवालदार प्रवीण क्षीरसागर व अंमलदार मजरूद्दीन सय्यद या जोडगोळीचे मोठे यश असून यासाठी आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे,पोलिस निरीक्षक शरद भुतेकर याचे मार्गदर्शन लाभत आहे.

'सोन्या' पाठोपाठ 'लाल्या' गळला.

ठाणे हद्दीत दोन ठिकाढी सशस्त्र दरोडा घालणारा मुख्य दरोडेखोर सोन्या चव्हाण च्या आठ दिवसापुर्वी मुसक्या आवळल्या होत्या.आता त्या पाठोपाठ अट्टल गुन्हेगार 'लाल्या'भोसलेच्या देखील मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

पाटोदा तालुक्यातील नायगाव घाटात बस-कारचा भीषण अपघात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी.


पाटोदा (प्रतिनिधी) : पाटोदा तालुक्या तील नायगाव घाटातील वळणावर एका हॉटेलसमोर मंगळवारी सांयकाळी पावणेआठच्या सुमारास रापमची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात कारचालक असलेला थेरला (ता. पाटोदा) येथील सरपंच पुत्र मोनू चंद्रकांत राख (वय २६) याचा जागीच मृत्यू झाला, तर विजय सानप (२९) आणि संघर्ष बांगर (२६) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता इतकी होती की, कारचा चक्काचूर झाला, तर बस रस्त्याच्या खाली गेली.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी झालेले विजय आणि संघर्ष या दोघांना बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या दोघांवरही उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Tuesday, September 23, 2025

                * आई  *
आई, मी पाहिले आरशात जेव्हा चित्र माझेच मला दिसले नाही.... 

तु गेल्या पासून आई हे मन खुलून कधी हासलेच नाही.....          

आई, मी प्रयत्न केला जरा स्वता:ला डोळ्यात निरखुन पाहण्याचा..... 

पण आड येणाऱ्या अश्रूंना माझ्या कधी कुणी पुसलेच नाही...... 

            श्री. हनुमंत मगर 

पुरात वाहून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली.निराधार महिलेचा झाला दुर्दैवी अंत.


आष्टी (प्रतिनिधी) : सांगवी आष्टी येथे पुरात वाहून आलेल्या एका महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. रामकंवर कचरू जगताप ( ४५, रा. शिराळ ता.आष्टी) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. त्या एक भिक्षेकरी असून निराधार होत्या. त्यांच्या अचानक मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रविवारी दुपारी सांगवी आष्टी येथे एका महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.तहसीलदार वैशाली पाटील या देखील घटनास्थळी होत्या. रविवारी रात्री सरपंच संदिप खेडकर आणि ग्रामस्थांसह गोताखोर रावसाहेब पिंपळे,हौसराव पिंपळे,शंकर बर्डे, महादेव बर्डे, उत्तम पिंपळे,बाबासाहेब गायकवाड यांच्या मदतीने रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

आज दुपारी मृतदेहाची ओळख पटली असून शिराळ येथील रामकंवर जगताप यांचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना पती अपत्य कोणीही नसल्याने त्या एकट्याच राहत होत्या. आष्टी आणि मिरजगाव येथे भिक्षा मागून त्या उदरनिर्वाह करत असत. त्यामुळे त्यांचे घर बंद असायचे. त्या हरवल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. मृतदेह सापडल्यानंतर काही तासांत त्यांची ओळख पटली आहे. घटनास्थळी तहसीलदार वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, वैद्यकीय अधिकारी, सरपंच संदिप खेडकर, पोलीस हवालदार प्रवीण क्षीरसागर, मजरूद्दीन सय्यद, याच्यासह बाहेरीर गोताखोर उपस्थित होते.

आष्टी तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका,अनेक गावांचा संपर्क तुटला. प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन.


आष्टी (प्रतिनिधी): रात्रीपासून मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने आष्टी तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून रहदारीसाठी असणारे मोठमोठे पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आष्टी तालुक्यात रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पुर आला आहे. पुराचे पाणी शेतात घुसून शेतांना नदीचे स्वरूप आल्याचे दिसून आले. कडा, खिळद, सुलेमान देवळा, शिराळ, देवीनिमगाव, धानोरा, महेश मंदिर, केरूळ यासह अनेक गावातील रहदारीसाठी असणारे मोठमोठे पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. नदीकाठच्या लोकांनी सुरक्षीत स्थळी थांबावे. कसलाही धोका पत्कारू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. पोलीस प्रशासनाकडून रस्त्यावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पावसाने संपूर्ण तालुक्यात जोर धरला आहे. नगर-बीड मार्गावरील कडा नदीवर पाण्याची पातळी वाढली असून कोणत्याही क्षणी मार्ग बंद होऊ शकतो. तसेच कडा-धामणगांव महामार्गावर असलेल्या देविनिमगांव पुलावरून पाणी जात आहे. आष्टी-मिरजगांव मार्गावर असलेला इमनगांव तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तर शिराळ येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा ही मार्ग बंद आहे. पुलावरून पाणि वाहत असताना नागरिकांनी सेल्फी काढणे, स्टंटबाजी करत पुरातून गाडी घालू नये, सतर्क राहा, प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन आष्टीच्या तहसिलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.

मराठवाड्यात पुन्हा अतिवृष्टीचा कहर पाच जणांचा मृत्यू,धाराशिव,बीड,छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय.


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) मराठवाड्यासह जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टीने अक्षरश: हाहाकार माजवला. मराठवाड्यातील ७५ मंडळांत अतिवृष्टी झाली असून पावसाने ५ जणांचे जीव घेतले आहेत. बीड आणि धाराशिव  जिल्ह्यात पावसाने कहर केला.  

पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टर व बोटींच्या साह्याने स्थलांतरित केले जात आहे. पुढील संपूर्ण आठवडा पावसाचा असणार आहे. तसेच,  शुक्रवारनंतर पावसाचा जोर आणखी वाढेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे.

दिवाळीपूर्वी भरपाई

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलदगतीने सुरू आहेत. दिवाळीपूर्वीच सर्व शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यात दिली, तर मराठवाड्यातील अतिवृष्टीचा सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी स्वतंत्र आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून परिस्थिती जाणून घेतली.

कुठे कुठे काय घडले?

हिंगोली : पांगरा (शिंदे) येथे ओढ्याला पूर आल्यामुळे ८० जण अडकले. त्यांना दोरीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले.जालना : दहा मंडळांत अतिवृष्टी, पुरात अडकलेल्या १४ जणांना वाचविले.धाराशिव : परंडा तालुक्यात २० पेक्षा अधिक गावांत पुराचे पाणी, चिंचोली (ता. भूम) येथे ७० वर्षीय महिलेचा मृत्यू.यवतमाळ : उत्तरवाढोणा (ता. नेर) वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू.जळगाव : भोकरी (ता. पाचोरा) येथे पुरात वाहून गेल्याने युवकाचा मृत्यू.

जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यातही धो धो

जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. रुग्णालये, घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.  सोलापूर जिल्ह्यात एकाच रात्री १९ मंडळांत अतिवृष्टी झाली.  चांदणी, भोगावती, नीलकंठा, नागझरी, राम, सीना नदीला पूर आला आहे. विदर्भात पावसाची विश्रांती असली तरी गेल्या काही दिवसांतील पावसामुळे पिकांची नासाडी झाली आहे. 

Monday, September 22, 2025

गटशिक्षणाधिकारी गिरी साहेब यांनी पद भार स्वीकारल्या बद्दल वारकरी मंडळाच्या वतीने सत्कार.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) आखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाचे अध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते गिरी साहेबांचा शाल श्रीफळ फेटा व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला या वेळी उपस्थित संगम सरपंच अच्युत पांडुरंग चव्हाण, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गोविंदराव कराड साहेब, अशोक कराड सर, पवार सर उपस्थित उपस्थित होते गिरी साहेबांचा सत्कार करून कोकाटे महाराजांनी शुभेच्छा दिल्या

माता भवानी व श्री बालाजी दसरा महोत्सवा निमित्त कंधार येथे जनाई महाराज कोकाटे यांच्या भागवत कथेचे आयोजन.

परळी वैजनाथ (वार्ताहर ) नांदेड जिल्हा कंधार येथे भव्य श्रीमद्भागवत कथेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री भवानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शहाजी नळगे व सचिव तथा कंधार पोलिस पाटील श्री व्यंकटराव जाधव  यांनी कळवले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परळी तालुक्याची कन्या संगमकर श्रीमद्भागवत कथा प्रवक्त्या ह.भ.प.जनाई महाराज कोकाटे यांच्या मुखारविंद्वातुन कथा उद्या दि.२३ सप्टेंबर रोजी मंडळ रोजी दुपारी १ते ५ कथेला प्रारंभ होणार आहे. 
तरी हाजारो भाविकांनी उपस्थित राहावे जनाई महाराज कोकाटे यांच्या मधुर वाणीतून कथा सजिव देखाव्या सहित कथा होणार आहे  या महोत्सवाचे आकर्षण श्रीमद्भागवत कथा देशविदेशातील नाविन्यपूर्ण झुले,आकाशी पाळणे ब्रेक डॉन्स झुला डायनासोर ड्रेगन ट्रेन मिमिक्रीमाऊस इत्यादी आकर्षक विविध भरगच्च कार्यक्रम कार्यक्रमाने दसरा उत्सव होनार आहे दुपारी भागवत कथा व रात्री भरगच्च कार्यक्रमे होनार आहे परिसरातुन हाजारो भाविक जनाई महाराज कोकाटे यांच्या कथेला उपस्थित राहाणार आहेत

परळीचे सुपुत्र, किरण गित्ते IAS, यांच्या योगदानाने त्रिपुराचा गौरव!पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्रिपुरा सुंदरी मंदिराचे उद्घाटन; गित्ते यांनी दिली प्रकल्पाची माहिती.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :  परळी वैजनाथचे नाव राज्याच्या सीमेपलीकडे पोहोचवणारे येथील सुपुत्र,मा .किरण गित्ते साहेब (IAS), यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाने त्रिपुरातील प्रसिद्ध त्रिपुरा सुंदरी मंदिराच्या नूतनीकरण झालेल्या संकुलाचे आज उद्घाटन झाले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ .माणिक सहा  जी उपस्थित होते हे मंदिर ५१ शक्तीपीठांपैकी एक असून, केंद्र सरकारच्या 'प्रसाद' योजनेअंतर्गत या मंदिराच्या विकासासाठी निधी देण्यात आला होता. त्रिपुराच्या पर्यटन विभागाने या प्रकल्पाच्या नियोजनात आणि कामात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याचे नेतृत्व किरण गित्ते यांनी केले.
या प्रकल्पामुळे मंदिराच्या परिसरात ५२ कोटींहून अधिक खर्च करून अनेक आधुनिक सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. यात भाविकांसाठी मोठे हॉल, लिफ्ट आणि इतर सुविधांचा समावेश आहे. यामुळे भाविकांची सोय झाली असून, स्थानिक लोकांनाही रोजगार मिळत आहे.
आज पंतप्रधानांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन सोहळ्यात, किरण गित्ते  साहेब यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंदिराच्या विकास प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या या योगदानाने त्रिपुराच्या धार्मिक आणि पर्यटन क्षेत्राला नवीन बळ मिळाले असून, आपल्या परळी वैजनाथ शहराचाही गौरव वाढला आहे.

Saturday, September 20, 2025

शिक्षण क्षेत्रात खळबळ! प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यावर बाल लैंगिक अत्याचाराचा आरोप. गुन्हा दाखल


केज (प्रतिनिधी)- केज येथे प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला आहे. याबाबत शुक्रवारी (दि. 19) रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान पीडित मुलीच्या फिर्यादीवरून उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे यांनी गुन्हा नोंदवला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 18) साडे आठ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या नातेवाईकांसोबत रस्त्याने पायी जात होती. यावेळी लक्ष्मण बेडसकर आपल्या कारने तिथे आला आणि मुलीसह तिच्या नातेवाईकांना चहा-पाणी करण्याच्या निमित्ताने कारमध्ये बसवून कोल्हेवाडीकडे नेले. कोल्हेवाडी शिवारातील निर्जन ठिकाणी गाडी थांबवून त्याने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

पीडित मुलगी आणि तिच्या सोबत असलेल्या महिलेने आरडाओरड केल्यानंतर लक्ष्मण बेडसकरने दोघींना जीवे मारण्याची धमकी दिली. परंतु, त्या वेळी पाठीमागून एक वाहन येताच आरोपीने कार व मोबाईल त्या ठिकाणी सोडून पळ काढला, असे पीडिताने फिर्यादीत सांगितले. घटनेनंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिस अधीक्षक बीड यांची भेट घेऊन प्रकरणाची माहिती दिली. एसपींच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके पुढील करत आहेत.

पूर्वीही विनयभंगाचा प्रयत्नदरम्यान, दोन महिन्यांपूर्वीही (दि.15 जुलै) एका राजकीय पक्षाच्या तालुका अध्यक्षाच्या माध्यमातून एका महिलेने लक्ष्मण बेडसकर याच्यावर विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार  पोलिसात केली होती. पण, सदर महिलेने ऐनवेळी घुमजाव केल्यामुळे बेडसकरविरोधात गुन्हा दाखल झाला नव्हता.

ब्रम्हलीन संत गुरुदेव महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त ह.भ.प.जनाई महाराज कोकाटे यांचे प्रवचन संपन्न झाले.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  घाटनांदुर येथील गुरुदास सेवा आश्रमात जनाई महाराज कोकाटे यांच्या प्रवचनाने वृद्ध महिला व वृद्ध पुरुष व उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आले कारण जनाई महाराज कोकाटे यांनी आपल्या प्रवचनात मुलं म्हणजे देवाघरची फुल ती पवित्र आहेत ती पवित्रच राहीली पाहिजे त्यांना गरिबी श्रीमंतीच्या वादाची झळ किंवा पंथ पक्षाचा वारा अनितीची जळमट नाही लागु देता कामानय तरच इथे देवाचं राज्य येईल देशाचा उज्ज्वल भविष्यकाळला त्यांच्या रुपाने साकार होईल प्रत्येक आई वडीलांना वाटत माझा मुलगा मोठा होवावा वाटतो पण मोठा झाला व लग्न झाले कि तो केव्हा बदलतो ते त्यालाच कळत नाही आज मि प्रवचन करण्यासाठी आलेले नाही तर मि तुम्हाला भेटायला आश्रमात आले आणि माझ्या पवचनातुन तुम्हा सर्वांना पाहुण माझ्याच डोळ्यात पाणी आलं कारण कोणत्याही व्यक्तीला वाटत नाही मि वृद्ध आश्रमात राहव पण काय करावं नालायक लेकरं जन्माला आले मि पुर्ण आविष्य कष्टाने मिळवले कष्ट केले पण पुढे काय होणार हेच कोणाला कळेनासे झाले जनाई महाराज म्हणतात कि बाबाहो कमविण्याच्या नादात‌ मुला मुलींना संस्कार द्या देवाला धर्माला विसरून नका मोठ्यांचा आदर करा कोणीही आपल्या आई वडीलांना आश्रमात सोडु नका आई वडील हेच आपले देव आहेत आई वडीलांचा आदर करा आई वडीलांना सांभाळा असं पोटतिडकीने आपल्या प्रवचनातुन जनाई महाराज बोलुलागल्या राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांनी हेच समाजाला शिकविलेले आहे समाज सुधरला पाहिजे अस जनाई महाराज आपल्या प्रवचनात बोलत होत्या आज मला या आश्रमात सेवा दिली सर्व आजोबा आजींच्या समोर मला पवचनातुन बोलता आले मि नक्की पांडुरंगचरणी प्रार्थना करते कि इथे या आश्रमात ज्यांचे ज्यांचे आई वडील  आहेत त्यांनी आप आपल्या आई वडिलांना घरी घेऊन जा आपल्या नातवंडासोबत आनंदी राहुद्या ते जास्त दिवस जगतेन पण या गुरुदेव आश्रमात अतीशय सुंदर या सर्व वृद्धांची यवस्था देखभाल जेवणाची उत्तम व्यवस्था केली जाते या सर्व वृद्धांची देखभाल सांभाळही चांगला केला जातो जनाई महाराजांनी पवचनाच्या माध्यमातून आढावा घेतला व या पवचनातुन वृद्धांना घरची आठवणदेखील वृध्द विसरले सर्व महिला व पुरुषांनी प्रवचन श्रवण केले प्रवचन संपवलं हे कळताच सर्व महिला जवळ उठून आल्या व जनाई महाराजांच्या गालावरुन हात फिरवु लागल्या व सर्वांनी आशीर्वाद दिला प्रवचन ब्रम्हलीन गुरुदेव महाराज यांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्त तीसऱ्या दिवसांची प्रवचन सेवा झाली आश्रमाच्या वतीने यमुनाबाई सोनवणे यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला व आभार माणले

Friday, September 19, 2025

डीएनए तपासणीनंतर मृतदेहाची ओळख. UPI व्यवहाराने आरोपी सापडले धाराशिव मध्ये खुनाच्या तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा


धाराशिव (प्रतिनिधी) : एका खून प्रकरणात तीन आरोपींना १८ सप्टेंबर राेजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. ठुबे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या तिघांना प्रत्येकी ११ हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला असून, हा दंड न भरल्यास ११ महिने सक्तमजुरी भोगावी लागेल. हे प्रकरण नोव्हेंबर २०२१ मध्ये घडले होते.

अधिक माहिती अशी की, गणेशनगर येथील शिवशंकर कोरे यांनी त्यांचा मुलगा कृष्णा कोरे बेपत्ता असल्याची तक्रार ढोकी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. याचदरम्यान, धाराशिव शहरातील आनंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गडदेवधरी शिवारात एका अज्ञात व्यक्तीचा नग्न अवस्थेतील मृतदेह सापडला. डीएनए तपासणीनंतर हा मृतदेह कृष्णा कोरे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा तपास करत असताना, पोलिसांना कृष्णा कोरेच्या मोबाइलवरून हॉटेल मेघदूत, शिंगोली येथे ऑनलाइन पैशांचे व्यवहार झाल्याचे आढळले.

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास केला असता, रमेश भगवान मुंडे, अमोल अशोक मुंडे (दाेघे रा. काेयाळा, ता. धारूर) आणि शिवशंकर हरिभाऊ इंगळे (रा. इंगळे वस्ती, ता. केज) हे तिघे आराेपी निष्पन्न झाले. चौकशीत असे समोर आले की, आरोपींनी कृष्णा कोरेला गाडीत बसवून त्याच्याकडून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने नकार दिल्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर त्याला गडदेवधरी येथील मोकळ्या जागेत नेऊन दोरीने हात बांधले आणि त्याचा मोबाईल घेतला. आरोपींनी कृष्णाच्या मोबाईलवरून हॉटेलमध्ये २ हजार १०० रुपये आणि एका रिक्षाचालकाला ३ हजार ५०० रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. त्यानंतर, त्यांनी कृष्णाचा गळा दाबून व लोखंडी रॉडने मारहाण करून त्याला ठार केले.पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याचे कपडे काढले आणि मृतदेह तिथेच सोडून दिला. पाेनि. दराडे, चिंतले, पारेकर, बांगर यांनी तपास केल्यानंतर न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल करण्यात आले. हा खटला न्यायालयासमाेर उभा राहिला असता, जिल्हा सरकारी वकील महेंद्र बी. देशमुख यांनी या प्रकरणात एकूण २७ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने १८ सप्टेंबर राेजी तिन्ही आराेपींना दाेषी ठरवून जन्मठेप आणि ११ हजार रुपये दंडाची शिक्षा ठाेठावली.

घरकुलासाठी मागितली लाच.केज पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातच ग्राम पंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात.




केज (प्रतिनिधी) पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणारे 'बे बाकी' प्रमाणपत्र देण्यासाठी २ हजार रूपयांची लाच स्वीकारताना केज तालुक्यातील केकतसारणी येथील ग्रामपंचायत अधिकारी गंगाधर सुरेश ठोंबरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे.

एका ३५ वर्षीय पुरुषाने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. ठोंबरे यांनी तक्रारदाराच्या घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी ५ हजार रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ही ४ हजार रूपये देण्याचे ठरले. त्यातील पहिला हप्ता म्हणून दोन हजार रूपये स्वीकारण्याचे मान्य केले. १९ सप्टेंबर २०२५ रोजी एसीबीने केज येथील पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. यावेळी आरोपी ठोंबरे यांनी तक्रारदाराकडून दोन हजार रूपये घेताच त्याला पथकासमोर रंगेहाथ पकडण्यात आले.

पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सोपान चिटमपल्ले, पोलीस निरीक्षक समाधान कवडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश सांगळे, पोलीस अंमलदार अनिल शेळके, अविनाश गवळी आणि अंबादास पुरी यांनी ही कारवाई केली. ठोंबरे याच्याविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.

हाळम सार्वजनिक दुर्गोत्सवाच्या अध्यक्षपदी चैतन्य मुंडे उपाध्यक्ष विजय दहिफळे तर सचिवपदी गणेश फड याची निवड.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी तालुक्यात ग्रामीण भागातील हाळम या गावी साजरा होत असलेल्या हाळम फेस्टिवल सार्वजनिक दुर्गा महोत्सव विसावे वर्षात पदार्पण होत असल्याची माहिती स्थापन माधव मुंडे यांनी
     याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी तालुक्यात असणारे संबंध जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक आरोग्य समाज प्रबोधन आधी विषयांना धरून साजरा होणारा नवरात्र उत्सवातील एकमेव महोत्सव म्हणजे कळम फेस्टिवल आहे या फेस्टिवलच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात याही वर्षी हा उत्सव साजरा होत आहे याला एक विशेष महत्त्व असून
यामध्ये विविध उपक्रम राबवले जातात आणि सातत्याने साजरा होणारा हा कळंब फेस्टिवल येणाऱ्या काळात आपले सामाजिक वेगळेपण सिद्ध करेल असा विश्वास संस्थापक माधव मुंडे यांनी व्यक्त केला
नवीन कार्यकारणी मध्ये अध्यक्षपदी चैतन्य माधवराव मुंडे व उपाध्यक्षपदी विजय दहिफळे तर सचिव पदी गणेश फड यांची निवड करण्यात आली व मार्गदर्शक म्हणून प्रशांत फड याची निवड करण्यात आली आहे तर उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली उपाध्यक्ष -गणेश मुंडे, गणेश गुट्टे, सहसचिव-प्रदीप दहिफळे कोषध्यक्ष -गणेश तुकाराम दहिफळे सदस्य -प्रदीप गित्ते, ओमकार दहिफळे रोहन गित्ते, वैभव गित्ते आदी जनाची निवड करण्यात आली

धक्कादायक! मुलीच मनाविरुद्ध बाल विवाह लावला नंतर जावयासोबतही अनैतिक संबंध.


धारूर (प्रतिनिधी): तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या आई आणि नातेवाइकांनी तिची इच्छा नसताना तिचे लग्न लावून दिल्याची तक्रार धारूर पोलिस ठाण्यात मंगळवारी दाखल केली आहे. लग्न झाल्यापासून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच पतीने अत्याचार तर केलाच पण आपल्याच आईचे पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोपही पीडितेने तक्रारीत केला आहे.

तक्रारदार मुलगी आणि तिच्या दोन लहान बहिणी आईसोबत राहत होत्या, कारण त्यांचे वडील २०१६ मध्ये घर सोडून गेले होते. २०१७ मध्ये ती सातवीत असताना तिच्या आईने गावातील एका तरुणासोबत तिचे लग्न धारूरमधील एका मंदिरात लावून दिले. लग्नाला आपली इच्छा नसतानाही आई, सासू, मावशी, चुलत दीर, चुलत सासरा, आणि चुलत सासू यांनी लग्न लावले. त्यानंतर तिला सासरी नांदायला पाठवले गेले. तिथे तिच्या पतीने इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. याबाबत तिने आईला आणि सासूला सांगितले असता, त्यांनी तिलाच बळजबरी केली. या मुलीने आपल्या आईचे संबंध तिच्या पतीसोबत पाहिल्याने तिला मानसिक त्रास होऊ लागला. 'तु आम्हाला बदनाम करतेस' असे बोलून त्रास देऊ लागले. या त्रासाला कंटाळून ती मार्च २०२२ मध्ये आजी-आजोबांकडे गेली आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला. तेथेही आई आणि पती पोहचले. 

या त्रासातून सुटका व्हावी म्हणून ती १७ एप्रिल २०२२ रोजी मानवलोक सेवाभावी संस्था, अंबाजोगाई येथे गेली. तेथील अधिकारी अरुंधती पाटील यांना तिने सर्व हकीकत सांगितली. १८ एप्रिल २०२२ रोजी मानवलोक सेवाभावी संस्थेतील अश्विनी जगताप यांनी तिला बाल कल्याण समिती, बीड येथे हजर केले. समितीच्या आदेशानुसार ती अंबाजोगाई येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या बालगृहात राहत आहे. आता ऑगस्ट २०२५ मध्ये बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षांनी भेट दिल्यावर हा छळ सांगितला. त्यानंतर याप्रकरणात चार वर्षांनंतर गुन्हा दाखल झाला आहे. बीडमधील बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे, सदस्य संतोष वारे, सुरेश राजहंस, छाया गडगे आदींनी पीडितेला धीर दिला.

Thursday, September 18, 2025

होमिओपॅथिक डॉक्टरांना आधुनिक उपचारांच्या परवानगी विरोधात आयएमए चा उद्या राज्यव्यापी संप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन.


बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकामुळे 'इंडियन मेडिकल असोसिएशन' आक्रमक झाली आहे. 'सीसीएमपी' कोर्स उत्तीर्ण झालेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, ज्याच्या विरोधात १८ सप्टेंबर रोजी राज्यभरातील सर्व एमबीबीएस डॉक्टर लाक्षणिक संप पुकारणार आहेत.

आयएमएने या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, यामुळे आरोग्य सेवेच्या गुणवत्तेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. एमबीबीएस अभ्यासक्रम हा ५.५ वर्षांचा असून त्यात १९ विषयांचा सखोल अभ्यास, क्लिनिकल अनुभव आणि एक वर्षाची इंटर्नशिप असते. याउलट, सीसीएमपी हा केवळ एक वर्षाचा कोर्स असून, आठवड्यातून फक्त दोन दिवस शिकवला जातो. अशा अपूर्ण प्रशिक्षणाने आधुनिक वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये विकसित होऊ शकत नाहीत. बीड आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनंत मुळे आणि सचिव डॉ. अमोल गीते यांनी या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर्स एक दिवसाचा संप करणार असून, याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.

रुग्ण सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह.

अपूर्ण प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींकडून उपचार झाल्यास चुकीचे निदान, दुष्परिणाम, अँटीबायोटिक रेसिस्टन्स आणि रुग्णाच्या मृत्यूची शक्यता वाढू शकते, अशी भीती आयएमएने व्यक्त केली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि राज्य वैद्यकीय परिषदांच्या नियमांनुसार, आधुनिक औषधोपचाराचा परवाना फक्त एमबीबीएस आणि त्यानंतरच्या पात्रतेसाठी आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा प्राचार्य.अतुल दुबे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणुन संपूर्ण मराठवाड्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते असुन याच अनुषंगाने नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे 17 सप्टेंबर 2025 बुधवार रोजी सकाळी 8:10 वाजता स्वामी रामानंद तिर्थ यांच्या प्रतिमेचे पुजन आणि तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते  करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी महाविद्यालयाचे  प्रा.के.एच.जायभाये, प्रा. पी.पी.तिडके मॅडम, प्रा.यु.एन.फड, प्रा.ए.एन. खाकरे, प्रा . एस.आर.कापसे , प्रा.ए.डी.शेख , प्रा.एस.के.अपार मॅडम , प्रा.पी.पी. परळीकर, एस.बी.आष्टेकर, व्ही.एन.शिंदे,  ए.बी.जगतकर ,जी.व्ही.कांबळे, यु.बी.जगताप ,यांच्या सह प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Wednesday, September 17, 2025

बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण ५० वर्षांच्या स्वप्नपूर्तीमागे तरुणांचा मोठा संघर्ष.


बीड (प्रतिनिधी) अनेक वर्षां पासून बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. १७ सप्टेंबर रोजी बीडमधून रेल्वे धावणार असून, या ऐतिहासिक क्षणामागे स्थानिक नागरिक, तरुणांचा मोठा संघर्ष दडलेला आहे. विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीच्या अथक प्रयत्नांमुळे हा रेल्वे प्रश्न राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर पोहोचला आणि त्यातूनच हा मार्ग मोकळा झाला.

मागील ५० वर्षांपासून बीडमध्ये रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रलंबित होती. रेल्वे काम वेगाने करावे, निधी द्यावा या मागणीसाठी तरुणांनी एकत्र येऊन विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीची स्थापना केली. या समितीने मोर्चे, उपोषणे आणि निदर्शने अशा अनेक मार्गांनी आंदोलने केली. यापैकी सर्वात महत्त्वाचं आंदोलन बीडच्या आकाशवाणी केंद्रावर ३१ जानेवारी रोजी २००७ रोजी झाले होते. या आंदोलनात युवक क्रांती दल, एआयएसएफ, एसएफआय, संभाजी ब्रिगेड, छावा यांसारख्या अनेक संघटनांचे तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यावेळी आकाशवाणी केंद्रावर तोडफोड झाली आणि पोलिसांनी लाठीचार्ज करत १७ युवकांना ताब्यात घेतले होते. या घटनेमुळे बीडच्या रेल्वे प्रश्नाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले. रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष जयप्रकाश आघाव, सचिव संगमेश्वर आंधळकर, उपाध्यक्ष अंबादास आगे, स्व. अमोल गलधर, सुशीला मोराळे, पंडित तुपे, शैलेश जाधव, संजय सावंत, ज्योतीराम हुरकुडे, पंकज चव्हाण, गणेश उगले, गंगाधर काळकुटे, अशोक तावरे, वैभव काकडे आणि इतर अनेक तरुणांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी तत्कालीन खासदार जयसिंगराव गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले. मुंबईच्या आझाद मैदानावर तीन दिवस आमरण उपोषण केले आणि विविध ठिकाणी मोर्चे काढले.

आंदोलनामुळे घेतला निर्णय.

आकाशवाणी केंद्रावरील आंदोलन संदर्भाने तत्कालीन पालकमंत्री स्व. विमल मुंदडा यांच्या पुढाकाराने मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर कृती समितीची बैठक झाली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी बीड रेल्वे प्रकल्पासाठी ५० टक्के खर्च राज्य सरकार देईल, असे लेखी पत्र दिले. या पत्रामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात करार झाला आणि रेल्वे कामाला वेग आला. सामाजिक कार्यकर्ते संगमेश्वर आंधळकर यांनी सांगितले की, आज बीडमध्ये रेल्वे सुरू होण्यामागे या विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीचा संघर्ष आणि तरुणांचे मोठे योगदान आहे.

बीड जिल्हा पालकमंत्री अजित पवारांच्या ताफ्यासमोर दोन तरुणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न. पोलिसांची धावपळ


बीड (प्रतिनिधी)  बीड दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांचा ताफा ज्या रस्त्यावरून जात होता, तिथे अचानक दोन तरुण आले. त्यांनी बॉटलमधून अंगावर पेट्रोल ओतले. हे बघताच पोलिसांनी धाव घेत त्यांना पकडले. यावेळी गोंधळ उडाला होता. बुधवारी सकाळी शहरात ही घटना घडली. 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार ध्वजारोहण करण्यासाठी बीडमध्ये आले. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी ते पोलीस ग्राऊंडकडे निघाले होते. नगर नाका परिसरात ताफा येताच दोन तरुण रस्त्यावर आले आणि त्यांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. 

अंगावर पेट्रोल ओतले, पोलिसांची दमछाक

दोन्ही तरुणांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वतः पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण, वेळीच पोलीस कर्मचारी त्यांच्या दिशेने धावले. तरुण अजित पवारांच्या गाडीच्या दिशेने पळायला लागले. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना पकडले. 

पालकमंत्री अजित पवार शहरात येणार असल्यामुळे आधीपासूनच सुरक्षेबद्दलची खबरदारी घेण्यात आली होती. पण, अचानक दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांची त्यांना पकडताना दमछाक झाली. 

आत्मदहनाचा प्रयत्न का केला?

पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही तरुण केज तालुक्यातील असल्याची माहिती आहे. त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.

यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते, पण त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला होता, अशी माहिती मिळाली आहे. 

Tuesday, September 16, 2025

हरवलेल्या वडिलांचा शोध न लागल्यान पोलीसांच्याे निष्क्रियतेमुळे, प्रशासकीय उदासीनतेमुळे निराश.तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल.


बीड: (प्रतिनिधी)"बीडला पहिली रेल्वे धावेल आणि त्याच रेल्वेखाली जीवन संपवणारा मी पहिला असेल." हे शब्द आहेत एका हतबल मुलाचे, जो गेल्या चार वर्षांपासून आपल्या हरवलेल्या वडिलांचा शोध घेत आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे निराश झालेल्या प्रसाद रत्नाकरराव बोरे (वय ३८) या तरुणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलवर पत्र लिहून आपला जीव देण्याचा इशारा दिला आहे. पालकमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून व्यथा मांडण्याच्या प्रयत्न केला असता त्यांची वेळ देखील मिळत नसल्याचे बोरे यांनी हतबल होऊन सांगितले.

जिल्ह्यात बहुचर्चित असलेली रेल्वे प्रत्यक्षात १७ सप्टेंबर रोजी, मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी रोजी सुरू होणार आहे.बीड ते अहिल्यानगर रेल्वेला १७ सप्टेंबरला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत. प्रसाद बोरे यांना शहरात येणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी वेळ देण्यात आला नाही. मात्र, त्यांनी मुख्यमंत्र्यांना मेल पाठवून हरवलेल्या वडिलांना शोधून देण्याची मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाची अपेक्षित साथ नाही, स्वतः राज्यभर शोध घेऊनही वडिल सापडत नाहीत, यामुळे जगण्यात अर्थ राहिला नसल्याने हतबल होऊन बोरे यांनी जीवन संपविण्याचा इशारा दिला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

बीडमध्ये वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले प्रसाद बोरे यांचे वडील रत्नाकर अंबादास बोरे हे २८ जुलै २०२१ पासून पांगरी रोड, बीड येथून बेपत्ता आहेत. वडिलांच्या मिसिंगची तक्रार दाखल केल्यापासून प्रसाद यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. पिंपरी-चिंचवड येथे एका सीसीटीव्हीमध्ये त्यांचे वडील दिसले, अशी माहिती मिळाल्यानंतरही पोलिसांनी विशेष तपास केला नाही, असा आरोप प्रसाद यांनी पत्रात केला आहे.

'पोलिसांची उत्तरं बालिशपणाची होती'.

प्रसाद यांनी आपल्या पत्रात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणतात, "आम्ही बीड पोलिसांना कळवले, पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती दिली, पण बीड पोलिसांची उत्तरं अगदी बालिशपणाची होती. राजकीय दबाव असल्याशिवाय पोलीस काम करत नाहीत, हे तेव्हा लक्षात आले."चार वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात वडिलांना शोधूनही ते सापडले नाहीत. प्रसाद यांच्या मते, त्यांच्या वडिलांचे कोणाशीही घरगुती किंवा वैयक्तिक वाद नव्हते, तरीही ते अचानक बेपत्ता झाले. या आघाताने त्यांच्या आईची तब्येतही बिघडली आहे.

"सामान्य नागरिकांना मेल्याशिवाय न्याय मिळत नाही".

प्रसाद यांनी आपल्या पत्रात, बीडमध्ये सामान्य नागरिकांना मेल्याशिवाय न्याय मिळत नाही, असे गंभीर विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, "गेल्या महिन्यात एक मुलगा जो ७ वर्षांपूर्वी हरवला होता, तो पोलिसांना सापडला. मग माझ्या वडिलांना चार वर्षांपासून पोलीस का शोधू शकले नाहीत?" हा प्रश्न त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

आत्महत्येनंतरच्या तीन अटी.

आपल्या पत्रात प्रसाद यांनी १७ सप्टेंबर रोजी बीड रेल्वेच्या उद्घाटनाच्या दिवशी पहिली आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांना तीन महत्त्वाच्या इच्छाही सांगितल्या आहेत:- त्यांच्या मृत्यूनंतर मृतदेह त्यांच्या परिवाराकडे घरपोच देण्यात यावा.- परिवाराला कोणतीही आर्थिक मदत (भीक) दिली जाऊ नये, कारण त्यांचा परिवार स्वाभिमानी आहे.- या आत्महत्येचे राजकारण केले जाऊ नये.

या पत्राने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून, आता पोलीस आणि सरकार यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई येथून परळीकडे जाणारी कार पुला च्या कठड्याला धडकून भीषण अपघात दोन जागीच ठार.


केज (प्रतिनिधी) : मुंबई येथून परळीकडे जाणारी कार पुलाच्या कठड्याला धडकून झालेल्या भीषण अपघातात परळी येथील एका व्यापाऱ्यांसह, कारचालक असे दोघेही जागीच ठार झाले. हा भीषण अपघात मंगळवारी (दि. 16 ) पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान केज तालुक्यातील कदमवाडी शिवारात झाला. अपघातात कार चक्काचूर झाली आहे.

परळी येथील  बूट,चप्पलचे ठोक विक्रेते इम्रान कच्छी आणि त्यांचा कारचालक अझरुद्दीन बाबामियाँ शेख हे दोघेजण सोमवारी रात्री मुंबई येथून कारने ( एम एच 02 सी एच 6789) परळीकडे प्रवास करत होते. मंगळवारी ( दि. 16 ) पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान अहमदपूर -अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गांवर केज तालुक्यातील कदमवाडी  शिवारातील पुलाजवळ कारचालकाला डुलकी लागली. यामुळे नियंत्रण सुटून भरधाव कार पुलाच्या कठड्यावर धडकली. या भीषण अपघातात इम्रान इब्राहिम कच्छी (50) आणि चालक अझरुद्दीन बाबामिया शेख (40 , दोघे रा. परळी ) हे जागीच ठार झाले.

माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, सहाय्यक उप निरीक्षक अशोक सोनवणे, पोलीस नाईक रशीद शेख, व चालक शिंदे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रशांत नेहरकर आणि सुमित तेलंग यांच्या रुग्णवाहिकेतून जखमीना केज येथील रुग्णालयात रवाना केले. येथे तपासणी करून डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. डॉ. आयेशा शेख यांनी मृतदेहांचे शवविच्छेदन केले. दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान दोघांचेही पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. दोघांवर ही परळी येथे दफनविधी संस्कार करण्यात आले.

लाखो लोकांच्या अब्जावधी रुपयांवर डल्ला मारून फरार असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या फरार अर्चना कुटे अटक!


बीड (प्रतिनिधी) लाखो लोकांच्या अब्जावधी रुपयांवर डल्ला मारून गेल्या वर्ष दीड वर्षापासून फरार असलेल्या कुठे ग्रुपच्या प्रमुख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या प्रकरणातील आरोपी अर्चना कुटे आणि अन्य एका महिलेस पुणे येथून अटक करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

ऑक्टोबर 2023 मध्ये कुटे ग्रुपच्या सर्वच समूहांवर इन्कम टॅक्स विभागाच्या वतीने छापा घालण्यात आला होता मोठ्या प्रमाणात इन्कम टॅक्स चोरी केल्याचे उघडकीस आल्यानंतर कुठे यांची सर्व प्रतिष्ठान सील करण्यात आली होती.

द कुटे ग्रुप वर इन्कम टॅक्स विभागाकडून कारवाई झाल्यानंतर त्याचा परिणाम ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या व्यवहारावर झाला मोठ्या प्रमाणात ज्ञानराधा मध्ये ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांना पैसे मिळण्यास अडचणी येऊ लागल्या पेनिक होऊ नका शांततेने घ्या आपल्याला लोन सॅमसंग झाले आहे अशा मोठ्या बाता मारणारे व्हिडिओ कुटे यांच्यावतीने मीडिया मधून प्रसारितही करण्यात आले परंतु ठेवीदारांना छदामही मिळाला नाह.

अखेर सुरेश कुटे अर्चना कुटे आशिष पाटोदकर यशवंत कुलकर्णी यांच्यासहित संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांवर बीड संभाजीनगर जालना लातूर धाराशिव पुणे अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले जून 2024 मध्ये सुरेश कुटे आणि आशिष पाटोदकर यांना पोलिसांनी अटक केली त्यांच्यासोबत सर्व अर्चना कुठे यादीतील एस पी कार्यालयात आल्या होत्या परंतु तत्कालीन एसपी नंदकुमार ठाकूर यांनी कुठे मॅडमला चहा कॉफी करून परत पाठवले.

पोलिसांच्या आशीर्वादावर तब्बल वर्षभर पुणे मुंबई महाबळेश्वर अशा ठिकाणी ऐश करत फिरणाऱ्या अर्चना कुटे यांना अखेर पोलिसांनी पुणे शहरातील पाषाण रोड भागातून अटक केली आहे त्यांच्यासोबत आशिष पाटोतकर च्या आईला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

कै.शं.गु.ग्रामीण महाविद्यालयास सुगम गायन संगीत विभागात तृतीय पारितोषिक.

धर्मापुरी ( प्रतिनिधी) येथील कै शं गु ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास नुकताच गेवराई येथे पार पडलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हा स्तरीय युवक महोत्सवात सर्व तृतीय पारितोषिक मिळाले आहे. 
अधिक माहिती अशी की नुकताच दि ११ आणि १२ सप्टें २५ रोजी गेवराई येथील र भ अटृल महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगरचा बीड जिल्हा स्तरीय युवक महोत्सव पार पडला.  यात येथील कै शं गु ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. दरम्यान ,कु मोहिनी सुनील कुलकर्णी ,कला तृतीय या विद्यार्थीनीने सुगम संगीत विभागात सर्व तृतीय पारितोषिक पटकावले आहे.तीच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ होळंबे टी एल, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा कातकडे के एस,प्रा डॉ रमाकांत गजलवार,प्रा डॉ सौ शिंदे एस वाय,प्रा जंगीटवार व्ही आर आणि प्रा भगवान आमलापुरे यांनी अभिनंदन करुन मोहिनीस शुभेच्छा दिल्या आहेत.लवकरच मोहिनीचा एक छोटे खानी सत्कार करण्यात येणार आहे.

Monday, September 15, 2025

अहिल्यानगर ते परळी वैजनाथ. बीड रेल्वेसाठी अजित पवारांकडून 150 कोटींचा निधी.


मुंबई (प्रतिनिधी) बीड जिल्ह्याच्या विकासात गेम चेंजर ठरणाऱ्या ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या महत्त्वाकांक्षी नवीन ब्रॉड गेज प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य शासनाने आजवर तब्बल 2 हजार 91 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. त्यात आज नव्याने 150 कोटींची भर घालून तो निधी आज वितरीत करण्यात आला आहे. या निधीच्या वितरणामुळे या रेल्वे प्रकल्पाच्या कामाला अधिक गती मिळणार असून, बीडकरांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची अनोखी भेट दिली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर, म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी ‘बीड-अहिल्यानगर’ या टप्प्यावरील रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.

‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या प्रकल्पासाठी राज्य शासनाचा एकूण आर्थिक सहभाग 50 टक्के असून, आजवर शासनाने तब्बल 2 हजार 91 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात आता नव्याने 150 कोटींची भर घालण्यात आली आहे. या निधीचा उपयोग 2025-26 या आर्थिक वर्षात रेल्वे विभागाला राज्य सरकारचा हिस्सा देण्यासाठी केला जाणार आहे. ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ हा रेल्वेमार्ग सुमारे 261 किलोमीटर लांबीचा असून, त्याचा एकूण खर्च 4 हजार 805 कोटी रुपये इतका आहे. त्यातील 50 टक्के म्हणजे 2 हजार 402 कोटी रुपये राज्य शासनाचा वाटा आहे. आजपर्यंत शासनाने तब्बल 2 हजार 91 कोटी 23 लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात आता आणखी 150 कोटींची भर घालण्यात आली असून या निधीचे वितरण आज (दि. 15 सप्टेंबर 2025 रोजी) करण्यात आले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दोन दिवस आधी वितरीत करण्यात आलेल्या या निधीमुळे या प्रकल्पाच्या विकासाला गती येणार आहे. या निधीचा उपयोग 2025-26 या आर्थिक वर्षात रेल्वे विभागाला राज्य सरकारचा हिस्सा देण्यासाठी होणार आहे. 


बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विमानतळ, रेल्वे व रस्ते विकासाला चालना देण्यासाठी विभागीय, जिल्हास्तरीय तसेच मंत्रालयीन पातळीवर विविध बैठका घेऊन त्यांनी संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधला आहे. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम म्हणून ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या महत्त्वाकांक्षी नवीन ब्रॉड गेज रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती मिळाली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर ‘बीड-अहिल्यानगर’ या टप्प्यावरील रेल्वे धावणार असून त्याचा थेट फायदा बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांना होणार आहे. 

 “अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्ग म्हणजे बीड, अहिल्यानगर आणि परळी वैजनाथ भागातील शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी आणि सामान्य जनतेसाठी विकासाला नवी गती देणारा प्रकल्प आहे. या मार्गामुळे जिल्ह्यातील गुंतवणूक वाढेल, रोजगारनिर्मिती होईल आणि वाहतूक सुलभ होईल. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा प्रकल्प गतीमान करण्याचा माझा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. बीड जिल्ह्याचा चेहरा बदलणाऱ्या या प्रकल्पामुळे बीडकरांच्या आयुष्यात नवा विकासप्रवास सुरू होईल” असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

बीड जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊसआष्टी तालुक्यातील पन्नास गावकरी पुरात अडकले!प्रशासन इयरलिफ्टच्या तयारीत!


बीड(प्रतिनिधी) तब्बल 24 तासापेक्षा अधिक काळापासून बीड जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे नदी नाल्यांना महापूर आला असून आष्टी तालुक्यातील सहा गावांमधील 50 पेक्षा अधिक लोक पुराच्या प्रमाणात अडकल्याने त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.

बीड जिल्हातील आष्टी तालुक्यामधील, कडा गावामध्ये 11 लोक, सोभा निमगाव मध्ये 14 लोक, घाटा पिंपरी 07 लोक, पिंपरखेड 06 लोक, धानोरा मध्ये  03 आणि डोंगरगण मध्ये 03 असे लोक अडकलेले आहेत. एकूण 06 गावात 44 लोकं अडकलेली आहेत 

जिल्हाधिकारी, बीड यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार, नगर जिल्ह्यातून लष्कराची तुकडी मदत कार्यासाठी मागविण्यात आली आहे तसेच अडकलेल्या लोकांना एअरलिफ्ट करण्यासाठी नाशिक वरून हॅलिकॉप्टर मागविण्यात आलेले आहे.

त्याचप्रमाणे पुणे येथुन एनडीआरएफ ची टिम बीड येथे पाठविण्यात येत आहे

आष्टी तालुक्यातील धामणगाव, दौलावडगाव, धानोरा, नांदूर, घाटा पिंप्री, देवळाली, देविनिमगाव, कुंठेफळ, केळ,पिंपळगाव, हरेवाडी, मराठवाडी, देऊळगाव घाट, बांदखेल, खिळद, गहुखेल, सुलेमान देवळा,दादेगांव, कारखेल खुर्द, आरणवीहिरा, तागडखेल, म्हसोबाचीवाडी, बाळेवाडी, कुंभेफळ, पुंडी इत्यादी ठिकाणी नदीचे पाणी पुलावर वाहत असल्याने इतर गावाचा संपर्क तुटला आहे

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पूरस्थिती बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला असून इंडिया आणि एसटीआरएफ यांच्या तुकड्या अहिल्यानगर जिल्ह्यातून पाचारण करण्यात आल्या आहेत. स्वतः अजित पवार हे या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून माजलगाव मांजरा यासह उर्दू कुंडलिका या प्रकल्पामधून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग पाहता ग्रामस्थांनी आणि प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश पवार यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी!


बीड (प्रतिनिधी) जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे अनेक नद्या नाल्यांना महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर कायम राहणार असल्याने बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळा अंगणवाडी आश्रम शाळा महाविद्यालय यांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी म्हटले आहे.

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहेत जिल्ह्यातील 16 मध्यम आणि 126 लघु प्रकल्प वसंतून वाहत असल्यामुळे शिरूर पाटोदा आष्टी बीड वडवणी गेवराई अंबाजोगाई परळी या तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

गोदावरी नदीपात्रामध्ये एक लाख दिवसात पेक्षा अधिकच पाणी विसर्ग करण्यात येत आहे तसेच वडवणीच्या उर्दू कुंडलिका माजलगाव मांजरा या धरणातून देखील गेटमधून हजारो की सेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्यामुळे अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

बीड सह महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पावसाचे संततदार सुरूच राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे या पार्श्वभूमीवर बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय आश्रम शाळा अंगणवाडी यांना सुट्टी दिली आहे.

शाळांना सुट्टी दिली असली तरी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि कर्मचारी यांनी शाळेत हजर राहावे असेही आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

Friday, September 12, 2025

दै.मराठवाडा साथी चे संपादक सतिश (सेठ) बियाणी यांना सा.कांतीकारी साथी व मगर परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली.

परळी वैजनाथ :- दै.मराठवाडा साथी चे  संपादक, मनमिळावू प्रगल्भ व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले परळीच्या प्रत्येक लहान थोरांच्या मनातील सतीश सेठ बियाणी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठवाड्यातील पत्रकारिता, समाजकार्य आणि सांस्कृतिक क्षेत्र पोरके झाले. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली. 

दैनिक मराठवाडा साथीचा आधारवड कोसळला.

पत्रकारिता, समाजसेवा, धर्मभाव आणि दिलदार स्वभावाचा मिलाफ असणारे दैनिक मराठवाडा साथी चे संपादक सतीशशेठ बियाणी हे आज आपल्यात राहिले नाहीत. दीर्घ आजाराशी झुंज देत असताना त्यांची प्राणज्योत मालवली आणि मराठवाडा साथी परिवाराने आपला खरा आधारवड गमावला आहे. मुख्य संपादक स्व. मोहनलालजी काकाजी बियाणी यांचा पत्रकारितेचा वारसा अखंडपणे पुढे चालवणारे सतीशशेठ हे खर्‍या अर्थाने वाक्यमूर्ती होते. पत्रकारितेतील सचोटी, निष्ठा आणि तळमळ त्यांच्या कार्यात नेहमीच दिसून येत होती.
सतीशशेठ यांचा आग्रह नेहमीच असा असायचा की प्रत्येक वार्ताहराची बातमी आपल्या पेपरमध्ये यावी. प्रत्येक वार्ताहराशी ते थेट संपर्कात राहायचे. कुणाला अडचण आली तर ती सोडवणे, त्यांच्या कुटुंबीयांकडे लक्ष देणे, आनंदात सहभागी होणे किंवा दुःखात धीर देणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांनी आपल्या मुलासारखे जपले. दहा दिवस आजारी असल्यामुळे त्यांचे बोलणे झाले नाही, ही खंत मनाला कुरतडते. कारण आयुष्यातला असा एकही दिवस मला आठवत नाही की ज्यादिवशी त्यांचा फोन आला नाही. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असे तीन वेळा ते माझ्याशी बोलायचे – हा संवादच जणू आमच्या नात्याचा श्वास होता.
सुरुवातीच्या काळात मराठवाडा साथी ची छपाई मोंढा येथील जगदीश प्रिंटिंग प्रेसमध्ये होत असे. मात्र कालांतराने सतीशशेठ यांच्या दूरदृष्टीमुळे मराठवाडा साथी अत्याधुनिक ऑफसेट मशिनवर प्रकाशित होऊ लागला. आज हा पेपर मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात पोहोचतो, हे त्यांच्या अथक परिश्रम आणि व्यवस्थापनशैलीचे फळ आहे. ते नेहमी म्हणायचे, “पेपर हा समाजाचा आरसा आहे; त्यात सत्य उमटलेच पाहिजे.” या तत्त्वावर त्यांनी पत्रकारितेची दिशा दिली.
सतीशशेठ यांचा स्वभाव अतिशय मायाळू होता. कर्मचारी वर्गाला ते नेहमी आपल्या कुटुंबाचा भाग मानायचे. कुणाचीही छोटीशी अडचण असली तरी ती स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन सोडवायचे. म्हणूनच मराठवाडा साथी हा केवळ वृत्तपत्र नसून एक जिव्हाळ्याचे कुटुंब आहे, अशी भावना सर्वांच्या मनात आहे. आज या दिलदार व्यक्तिमत्वाचा अंत झाला असला तरी त्यांची आठवण, त्यांचे संस्कार आणि त्यांचे कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी राहील.
त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मनाला मोठा धक्का बसला. पत्रकारितेचे एक युग संपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.अशा मनमिळावू, दिलदार आणि भक्तिभावाने ओथंबलेल्या व्यक्तिमत्वाला मी वैयक्तिकरित्या आणि संपूर्ण मराठवाडा साथी परिवाराच्या वतीने शतशः नमन करतो.
त्रिवार अभिवादन!

चौकट 
*धार्मिकता आणि भक्तिभाव*
सतीशशेठ हे प्रभू वैद्यनाथाचे अखंड भक्त होते. दररोज सकाळ, दुपार व संध्याकाळ तीन वेळा ते नित्य दर्शनाला जात असत. त्यांच्या भक्तिभावामुळेच त्यांचे मन सदैव शांत आणि स्थिर राहिले. धर्माशी जोडून समाजकार्य करणे हे त्यांचे ब्रीद होते.

माझ्यासाठी परिवारासारखा संबंध

सन १९९३ पासून मी मराठवाडा साथी सोबत कार्यरत आहे. त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सतीशशेठ यांचे मार्गदर्शन, प्रेम आणि पाठबळ माझ्यासोबत राहिले. हा प्रवास केवळ नोकरीचा नव्हता तर एक कुटुंबाचा होता. सतीशशेठ हे माझ्यासाठी संपादक नसून परिवाराचे ज्येष्ठ आधारस्तंभ होते. त्यांनी मला घडवले, वाढवले आणि आज मी जो काही आहे तो त्यांच्या कृपाशिर्वादाने आहे.

               *संतोष जुजगर*
                 परळी वैजनाथ

दै.मराठवाडा साथी चे संपादक सतीशजी बियाणी यांच्या दुःखद निधन.पत्रकारिते तील एक प्रगल्भ,मनमिळावू व्यक्तिमत्व हरपले.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):दै.मराठवाडा साथी चे ज्येष्ठ संपादक, मनमिळावू व प्रगल्भ व्यक्तिमत्व असलेले सतीशजी बियाणी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठवाड्यातील पत्रकारिता, समाजकार्य आणि सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
सतीशजी बियाणी हे केवळ संपादक नव्हते तर समाजातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून जनतेपर्यंत सत्य व निष्पक्ष बातम्या पोहोचविणारे निर्भीड पत्रकार होते. त्यांनी आपल्या लेखणीद्वारे समाजातील ज्वलंत प्रश्नांना नेहमीच वाचा फोडली.
त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय आत्मीय व मनमिळावू होते. प्रत्येकाशी जिव्हाळ्याने संवाद साधणे, प्रोत्साहनाचे दोन शब्द देणे, आणि आपलेपणा निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव होता. मी स्वतः 27 ऑगस्ट 2025 रोजी माझ्या वाढदिवशी त्यांचा फोन आला होता, त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि दै. मराठवाडा साथी मध्ये माझ्या विषयी लेख छापून मला आत्मिक आनंद दिला होता.
सतीशजींची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण जडणघडण म्हणजे त्यांची धार्मिक निष्ठा. दररोज ते श्री वैद्यनाथ प्रभूंच्या मंदिरात दर्शनाला जात असत. त्या वेळेस आमचा नेहमी नमस्कार व्हायचा. त्यांच्या या अध्यात्मिक श्रद्धेने त्यांच्या व्यक्तिमत्वात आणखी माधुर्य आणले होते.
समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, पत्रकारितेतून सकारात्मक बदल घडवणे, वाचकांचा विश्वास जपणे या त्यांच्या वाटचालीमुळे मराठवाडा साथी हे नाव घराघरात पोहोचले.
त्यांच्या निधनाने पत्रकारितेतील एक प्रभावी आवाज कायमचा हरपला आहे. त्यांचे मार्गदर्शन, आपुलकी आणि समाजहिताचा विचार करण्याची वृत्ती ही सदैव प्रेरणादायी ठरेल.
सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार केदारी, हिंद नगर, परळी वैद्यनाथ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, “सतीशजींच्या आठवणी सदैव प्रेरणादायी राहतील. त्यांचा आत्मीय स्वभाव व समाजहिताची तळमळ नेहमी स्मरणात राहील.”
सतीशजी बियाणी यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या स्मृती समाजमनात सदैव जिवंत राहतील. 

जैन साध्वींच्या प्रेरणेने फालक परिवाराने घेतली आजीवन मांसाहार त्यागाची शपथ.

भुसावळ (प्रतिनिधी) येथील चक्रधर नगर मधील जैन स्थानक  गादिया पौषध शालामध्ये श्रुतधर आचार्य प.पु.प्रकाश मुनीजी म.सा.यांच्या आज्ञानुवर्ती जैन साध्वी खुशालीजी म.सा.  आदि ठाणा चार यांचा चातुर्मास चालू आहे. या चातुर्मासात एक विचारणीय व संस्मरणीय धार्मिक घटना घडलेली आहे .जी एक अशक्य बाब होती ती ठाम मनोदयाने शक्य झाली.येथील सुशिक्षित,सुसंस्क्रुत धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रांमध्ये नावलौकिक असलेले व तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत असलेले विजय फालक व त्यांचे कुटुंबीय यांनी साध्वींच्या प्रेरणेने तहहयात मांसाहार करणार नाही याची शपथ घेतली असून फक्त एकोणावीस वर्षीय तरुण युवक व जयलक्ष्मी अकॅडमीचे संचालक  जय फालक याने  आजन्म मदिरा सेवन, धूम्रपान, गुटखा ,तंबाखू, हुक्का सेवन,जुगार या गोष्टी सुद्धा करणार नाही याची सुद्धा स्वतःहून साध्वीजिंकडे  इच्छा व्यक्त करून शपथ घेतली. लावण्या फालक ही युवती बाहेर शहरात एम.बी.ए चे उच्च शिक्षण घेत असुन तीने सुध्दा  मांसाहार त्याग करुन युवती पुढे आदर्श ठेवला. साध्वीजींनी या कुटुंबाला मनापासून धन्यवाद देऊन  त्यांनी घेतलेल्या अशक्यप्राय गोष्टींची शपथ याविषयी मार्मिक विवेचन केले.  तसेच त्यांना या बाबींचे महत्व पटवुन दिले. आज युवक वर्ग हा अध:पतनाकडे भरकट चाललेला असुन फालक कुटुंब व भावा बहिणींनी मात्र या सर्व कुव्यसनापासुन  फारकत घेतली आहे याबाबत त्यांची प्रशंसा केली.  तसेच आपण हा वारसा पुढे सुद्धा चालवणार असून अनेकांना या गोष्टीपासून प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करू व मी स्वामीसमर्थांची भक्त असुन त्यांच्याच क्रुपेने हे घडुन आले असावे, असे विद्यार्थी प्रिय  ताप्ती पब्लिक स्कूलच्या शिक्षिका,सुसंस्कारीत कुटुंब नायीका सौ. पुनम फालक यांनी मानस व्यक्त केला .त्यांच्या या कृती मागे ज्येष्ठ सुश्राविका व स्वाध्यायी सौ. शोभा ललवाणी यांची प्रेरणा होती व सौ. शोभा ललवाणी यांनी सुद्धा या कुटुंबाचे आभार व्यक्त केले की त्यांनी माझ्या इच्छेचा मान  राखून हा दृढ संकल्प केला. त्यांच्या या अध्यात्मिक बाबीचे व कठोर निर्णय धारण केल्याबाबत जेष्ठ सुश्रावक व जैन कॉन्फरन्सचे  प्रेमभाऊ कोटेचा, चातुर्मास समिती अध्यक्ष, टॅक्स कन्सल्टंट प्रशांत कोटेचा, आनंद ड्रेसचे संचालक सुनील कोटेचा,सोसायटी साडी सेंटरचे हेमंत मंडलेचा, कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डाँ.डि.एम.ललवाणी,डाँ. संजय गादिया, विजय गादिया, दिनेश संचेती, मदनलालजी ललवाणी,शिवसेना नेते ललीत मुथा,प्रा.आर टि.सुराणा,डाॅ.संदीप कोटेचा,सचिन डेलीवाल,सौ.पारस नाहाटा,सौ.ज्योती गादिया,सौ.संगीता मुगदिया,सौ.मंगला कोटेचा आदी अनेक माननीय व्यक्तींनी व जैन महिलांनी त्या परिवाराला धन्यवाद देऊन एका चांगल्या संकल्पनेची आपण मुहूर्तमेढ रोवली याबद्दल त्यांचे कौतुक केले.

Thursday, September 11, 2025

अश्विनी बडे यांना सा.शिक्षण मार्गचा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर .

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील फांऊडेशन  स्कूलच्या शिक्षीका श्रीमती अश्विनी राजे भाऊ बडे यांना साप्ताहिक शिक्षण मार्गचा शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर झाला असून नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या 7 व्या मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
श्रीमती  अश्विनी बडे या परळी येथील मध्यवर्ती फाउंडेशन स्कूल या शाळेमध्ये सध्या कार्यरत आहेत .अश्विनीताई बडे ह्या सुंदर भजन करतात अनेक महिलांना भजन शिकवितात. कीर्तनामध्ये प्रमाण व चाल, सुंदर म्हणतात सुंदर संचलन करतात  व सामाजिक, साहित्यिक व आध्यात्मिक कार्यातही योगदान आहे. या कार्याची दखल घेऊन शिक्षण मार्गाच्या वतीने त्यांना पुरस्कार जहिर करण्यात आला आहे.
त्यांना जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

भागवत कथेच्या चौथ्या दिवसात समाजा तील ऐक्य हेच खरी शक्ती” संदेश -ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) संगम (ता. परळी) परळी जवळील संगम येथे स्वर्गीय चिरंजीव अक्षय तुकाराम मुंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ श्रीमद् भागवतकथाचे आयोजन करण्यात आले आज चौथा दिवस कथेचा संपन्न झाला कथेमध्ये श्रीकृष्ण भगवान यांचा जन्म झाला कथेमध्ये जिवंत देखावा करण्यात आला  मनमोहक कृष्णाच्या रूपाने संगमकर भारावून गेले 
 सुरू असलेल्या श्रीमद्भागवत कथेच्या चौथ्या दिवसाचा कार्यक्रम आज गुरुवार दिमाखात पार पडला. या प्रसंगी प्रमुख भागवताचार्य ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे (संगमकर) यांनी आपल्या ओजस्वी वाणीतील कथेच्या माध्यमातून समाजातील ऐक्य, सद्भावना आणि परस्पर स्नेहाचे महत्व पटवून दिले.
आपल्या कथेत मध्ये जनाई महाराज म्हणाल्या – “समाजातील ऐक्य हीच खरी शक्ती आहे. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या समुद्रात एकवटतात, त्याप्रमाणे सर्व समाजघटकांनी आपले भेद विसरून भक्तीमार्गावर चालले पाहिजे. ईश्वरभक्तीमुळे मनात प्रेम, करुणा आणि क्षमा जागृत होते आणि त्यातूनच समाज सुदृढ होतो असे त्या म्हणाल्या 

कथेच्यावेळी भाविकांची लक्षणीयगर्दी उसळली होती. महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय ठरला. भजन-गायनात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिंतवादक जनक महाराज कदम पहाडी आवाजामध्ये श्रीकृष्णाचे गीत म्हणून उपस्थित सर्व त्यांच्या मनामध्ये आपण वृंदावन मध्ये आहोत असं वातावरण बनवलं पॅडवादक विनोद चव्हाण नांदेड जवळील उंचाडागाव व तबला साथ अशोक महाराज कराळे तर टाळ साथ श्रावणी कोकाटे-मृदंग साथ आनंदी कोकाटे उपस्थित श्रोत्यांना संगिताने निनाद घुमवत वातावरण भारावून टाकले. मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक जण कथेत एकरूप झाला होता.
गावात आलेल्या अनेक भक्तांनी सांगितले की, जनाई महाराजांची कथा ऐकतांना कधी डोळ्यातून अश्रू तर कधी चेहऱ्यावर हसू प्रत्येक श्रोत्यांच्या मनात प्रसन्नता दिसू लागली  आणि भक्तीचा उत्साह जाणवतो. कार्यक्रमामुळे श्री हनुमान मंदिर परिसरात दिवसभर भक्तिरसाचे वातावरण निर्माण झाले.
भागवत कथेच्या चौथ्या दिवसाबद्दल ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, भाविकांची उपस्थिती अधिकाधिक वाढेल, असा विश्वास‌ दत्तात्रय पंढरीनाथ मुंडे ज्ञानोबा पंढरीनाथ मुंडे तुकाराम पंढरीनाथ मुंडे अर्जुन पंढरीनाथ मुंडे व समस्त ग्रामस्थ संगम आयोजकांनी व्यक्त केला आहे.

धक्कादायक घटना! परळीत विस्तार अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या कारण मात्र गुल्दस्त्यात.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी वैजनाथ शहरातील शिवाजीनगर परिसरात बीड पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असणारे विस्तार अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास कळाली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.   
 याबाबत अधिक माहिती अशी की, परळी वैजनाथ शहरातील शिवाजीनगर भागात वास्तव्यास असलेले व बीड पंचायत समिती कार्यालयातील विस्तार अधिकारी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकिस आली आहे. विलास डोगरे असे आत्महत्या ग्रस्त व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्याचे कारण मात्र समजले नाही. विलास डोगरे यांच्या पाश्चत तीन मुली, आई पत्नी, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विलास डोगरे यांनी परळी पंचायत समिती कार्यलया अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचाय मध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा बजवाली आहे. धर्मापुरी , सिरसाळा, कन्हेवाडी ,अशा अनेक गावांत त्यानी चांगले काम करुन दाखवले आहे. विलास डोगरे यांच्या पार्थिवावर परळी तालुक्यातील खामगाव येथे सायंकाळी होणार आहे.

Wednesday, September 10, 2025

बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात यांचे निलंबन रद्द.कामगार विमा विभागात संचालक म्हणून नियुक्ती.



बीड (प्रतिनिधी) बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांचे निलंबन आरोग्य विभागाने रद्द केले असून त्यांना कामगार विमा विभागात संचालक म्हणून नियुक्ती दिली आहे.डॉ थोरात हे उद्या पदभार स्वीकारणार आहेत.

कोरोना काळात झालेल्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवत केजच्या आ नमिता मुंदडा यांच्या तक्रारीवरून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अधिवेशन काळात डॉ अशोक थोरात यांचे निलंबन केले होते. या विरोधात डॉ थोरात यांनी मॅट आणि उच्च न्यायालय येथे दाद मागितली होती.

दरम्यान राज्य सरकारने चार महिन्यानंतर डॉ थोरात यांचे निलंबन रद्द करत त्यांच्यावर संचालक पदाची जबाबदारी टाकली आहे. राज्य कामगार विमा विभागाची राज्यातील दहा ठिकाणी हॉस्पिटल असून त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आता डॉ थोरात यांना देण्यात आली आहे.

whatsapp sharing button

धक्कादायक घटना! तमाशातील नर्तकीच्या प्रेमात वेड्या झालेल्या मा.सरपंचाने तिच्या घरासमोरच कारमध्ये कोंडून घेत स्वत:वर घेतली गोळी झाडून.


बार्शी (प्रतिनिधी)  तमाशातील नर्तकीच्या प्रेमात वेड्या झालेल्या एका माजी सरपंचाने तिच्या घरासमोरच कारमध्ये कोंडून घेत स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील सासुरे या गावात घडली. मृत गोविंद बर्गे हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एका गावातील माजी उपसरपंच होते. ३४ वर्षीय बर्गे हे  विवाहित होते. तसेच त्यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि मुलगा असं कुटुंब उरलं आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार गोविंद बर्गे यांना गेल्या काही काळापासून कलाकेंद्रात जाण्याचा छंद लागला होता. त्यातून त्यांची ओळख पूजा गायकवाड या २१ वर्षीय नर्तकीसोबत झाली होती. काही दिवसांनी ही ओळख प्रेमात रूपांतरीत झाली. दरम्यान, गोविंद बर्गे यांनी पूजा हिला काही महागड्या भेटवस्तूही दिल्या होत्या. त्यामध्ये एका महागड्या मोबाईलचाही समावेश होता. एवढंच नाही तर तो पूजा हिला अधूनमधून दागदागिनेही भेट द्यायचा.

मात्र एवढी मैत्री असूनही पूजा हिने गेल्या काही दिवसांपासून गोविंद बर्गे याला टाळण्यास सुरुवात केली होती. गेवराईतील बंगला आपल्या नावावर करण्याचा आणि भावाच्या नावावर पाच एकर जमीन देण्यासाठी पूजा हिने आग्रह धरला होता. एवढंच नाही तर आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास अतिप्रसंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी पूजा हिने गोविंद यांना दिली होती, असा आरोप गोविंद बर्गे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

दरम्यान, पूजा हिने बोलणं कमी केल्याने गोविंद बर्गे हे अस्वस्थ झाले होते.   सोमवारी रात्री गोविंद बर्गे हे पूजा हिच्या घराजवळ आले होते. तिथून त्यांनी तिला वारंवार फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र पूजा हिने त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे गोविंद यांचा स्वत:वरील संयम सुटला. त्यांनी आपला कार पूजा हिच्या घरासमोरच पार्क करत कारचे दरवाजे लॉक केले त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवले.

पूजा हिने दिलेली धमकी आणि पैशांसाठी लावलेल्या तगाद्यामुळे गोविंद यांनी जीवन संपवल्याचा आरोप करत गोविंद यांच्या मेहुण्यांनी पूजाविरोधात तक्रार दिली आहे. दरम्यान, गोविंद यांची मुलं लहान आहेत, असं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी मुलांचा आणि आमचाही विचार करायला हवा होता, अशी खंत गोविंद यांच्या भावाने व्यक्त केली आहे.