Tuesday, September 2, 2025

अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाची श्रीं ची आरती.रेल्वे पोलीस पद्माकर मोगरे यांच्या हस्ते संपन्न.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळ आयोजित गणेश मंडळात श्रींची आरती अत्यंत भक्तीमय वातावरणात करण्यात आली.  पद्माकर मोगरे, रेल्वे सुरक्षा बल परभणी सौ. उर्मिला पद्माकर मोगरे व प्रभाकर आश्रुबा गिराम यांच्या हस्ते श्रीची आरती  संपन्न झाली
यावेळी माजी सरपंच सौ. वच्छालाबाई वैजनाथराव कोकाटे, ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी सरपंच सौ. ज्योती कोकाटे, परमेश्वर कोकाटे, सौ. मिरा कोकाटे, बाल कीर्तनकार ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे, मुक्ताई कोकाटे, श्रावणी कोकाटे, आनंदी रामेश्वर महाराज कोकाटे यांची उपस्थिती होती.
आरतीदरम्यान टाळ-मृदंगाच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले होते. उपस्थित भाविकांनी श्री गणरायाच्या जयघोषात आनंद व्यक्त केला.

No comments:

Post a Comment