परळी वैजनाथ (प्रतिनिधी) गणेशभक्तीचा उत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा सोहळा. याच परंपरेत हालगे गल्ली येथील नवचैतन्य गणेश मंडळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश विसर्जन दिनी भव्य दिव्य महाप्रसादाचे आयोजन करत आहे. शनिवार, दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते सायं. ४ या वेळेत हा महाप्रसाद सोहळा पार पडणार असून, हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या ३३ वर्षांपासून अखंडपणे श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने नवचैतन्य गणेश मंडळ विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत आहे. भक्तीबरोबरच समाजजागृती, दानधर्म आणि परोपकाराचे संस्कार जोपासत मंडळाने अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे शहर तसेच पंचक्रोशीत या मंडळाची विशेष ख्याती आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विसर्जन दिनी भक्तीभावाने महाप्रसादाचा महापर्व साजरा होत असून, यात लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी सहभागी व्हावे, हेच या आयोजनाचे वैशिष्ट्य आहे.
No comments:
Post a Comment