Monday, May 18, 2020

* लॉक डाऊननंतर...*

       
जगामध्ये कोरोना  महामारीने थैमान घातले आहे .त्यामुळे जग बंद आहे तसेच आपला देश ही लाँकडाऊन  झाला आहे कोरोना  विषाणूमुळे सर्व भयभीत झाले आहेत . या विषाणूवर आजपर्यंत कोणतीही लस किंवा औषध निर्माण झाले नाही. कोरोना  विषाणूमुळे समाजातअनेक बदल होणार आहेत. त्यामध्ये मुख्यतः सामाजिक ,आर्थिक ,शैक्षणिक राजकीय ,धार्मिक ,पारिवारिक, साहित्यिक या क्षेत्राचा उल्लेख करता येईल. कोरोनाचा काय परिणाम झाला आणि लाँकडाऊन उघडल्यानंतर  काय  बदल होऊ शकतो. यावर आपण खालील मुद्द्यांमध्ये विस्तृत चर्चा करणार आहोत.
    *सामाजिक बदल*
कोरोना  विषाणूमुळे सामाजिक व्यवस्था अत्यंत जलद गतीने बदलणार आहे. नागरी व ग्रामीण जीवनशैलीत बदल होणार आहे. शहरात रोजगार राहणार नाहीत त्यामुळे बेकारीचा भस्मासूर निर्माण होणार आहे. या बेकारीमुळे समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होणार आहे. शहरात राहण्यास कोणी तयार होणार नाही .सरकार शहरातील लोकांना रोजगाराची आश्वासन देत असले तरीही जीव  महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व शहरवासिय गावाकडे जाण्यास तयार होतील .शहरात उद्योगधंद्याला  मजूर ,कारागीर, कौशल्य प्राप्त नोकरदार उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे उद्योगधंदे बंद होतील. ग्रामीण भागात शहराकडून  आलेले मोठ्या प्रमाणात लोक बेरोजगार राहणार आहेत .प्रत्येकाला रोजगार गावाकडे नाही त्यामुळे गावाकडील सावकार, मोठे शेतकरी शेत मजुरांना अत्यंत कमी दरामध्ये रोजंदारी काम करून घेणार व त्यांचे शोषण करणाऱ. काही प्रमाणात महिला  मुलाबाळांचे  हाल होण्याची चिन्हे आहेत.
समाजामध्ये आज तरुण मुला- मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे ‌.त्यांचे लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे  .मुला-मुलींना नोकरीधंदा नसल्यामुळे तसेच मुलींच्या वडीलाकडे लग्न करून देण्यासाठी पैसे नाहीत.हे  तरुण मुलं-मुली आर्थिक परिस्थिती बदलेपर्यंत अविवाहित राहणार आहेत. आज सध्याच्या परिस्थितीत विवाह पद्धतीत बदल होताना दिसून येतो. काही तरुण तरुणी प्रेम विवाह, नोंदणी प्रमाणे विवाह, घरच्या मोजक्या लोकांच्या सोबतीने विवाह पार पाडून समाजामध्ये नवीन पद्धत रूढ करणार आहेत. कोरोनामुळे कमी लोकांमध्ये होणारा विवाह पद्धत गोरगरिबांसाठी एक नवीन पर्वणी घेऊन आला  आहे.या नवीन विवाह पद्धती चे स्वागतच करावे.
     कोरोना विषाणूमुळे एक महत्त्वाची गोष्ट झाली की, समाजातील व्यक्तीला पैशा पेक्षा माणूस श्रेष्ठ वाटत आहे. त्यामुळे "शिर सलामत तो पगडी पचास" या उक्तीचा सर्वत्र उपयोग केला जात आहे.  स्वतःची काळजी. परिवाराची,  आपल्या माणसांची काळजी माणूस घेत आहे. यामुळे समाजात समता, बंधुप्रेम, आपलेपण स्थापित होण्यास मदत होणार आहे , समाजातील अनेक रूढी परंपरा बंद होतील . ज्याप्रमाणे समाजामध्ये एक थाळीमध्ये जेवण करणे,गळाभेट घेणे, हस्तांदोलन आदी. ज्याच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो. अशा सर्व रुढी-परंपरा बंद होणार आहेत. आणि चांगल्या पण प्राचीन रूढी-परंपरा पुन्हा आपल्या देशांमध्ये रूढ होण्याची चिन्ह दिसत आहेत. उदाहरण स्वरूप घरी पाहुणे आल्यावर त्यांना स्वच्छ हात पाय धुण्यासाठी सांगणे ,संयुक्त कुटुंब पद्धतीचा विकास होणे आदी आहेत.
कोरोना विषाणूंमुळे सर्व लोक घरामध्ये लाँक झाले आहेत. त्यामुळे परिवारातील सर्व सदस्यांना नात्यांचे महत्व कळत आहे .प्रेमभाव वाढत आहे पण काही प्रमाणात पती-पत्नी मध्ये वाद झालेले दिसत आहेत. या सर्व गोष्टीकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास कोरोनाचा व्यक्तीला फायदा झाला आहे. कारण व्यक्ती स्वतःची ,आपल्या परिवाराची व आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नव्हता केवळ आपले काम -काम पाहत  होता पण कोरोनामुळे स्वतःवर व परिवारावर प्रेम ,काळजी करू लागला आहे.
  *आर्थिक परिस्थितीत बदल*
कोरोना  विषाणूचा महत्त्वाचा परिणाम आर्थिक परिस्थितीवर होणार आहे. शहरात बसलेली मोठे-मोठे उद्योग कामगारांमुळे बंद पडणार आहेत. कारण कामगार आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या मूळगावी जात आहेत .या विषाणूच्या भीतीपोटी हे पुन्हा शहराकडे येतील याची शाश्वती कुणीही देण्यास तयार नाही. गावाकडे मोकळे वातावरण, स्वच्छ हवा, पाणी असल्यामुळे लोकांना प्रसन्न वाटणार आहे. शहरांमध्ये गर्दी, राहण्यासाठी छोट्या-छोट्या जागा त्यामुळे या विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे .शासनाकडे प्रत्येक व्यक्तीला संरक्षण व आरोग्य सेवा देण्यास कमतरता भासणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कामगार गावाकडेच राहण्यास पसंदी देतील .उद्योगधंदे बंद झाल्यामुळे शासनाकडे महसूल जास्त प्रमाणात येणार नाही .त्यामुळे शासन नवनवीन योजना त्यांच्या अंमलबजावणी करण्यास तयार होणार नाही .यामुळे सर्व प्रगती थांबणार आहे .पण यापरिस्थितीत अनेक नवीन उद्योगपती निर्माण होणार आहेत. कारण बेकारीचा महासुर व्यक्तीला उद्योग धंदा करण्यास भाग पाडणारा आहे .पहिल्यांदा छोटा-मोठा उद्योग निर्माण करून  भविष्यत चांगला उद्योगपती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. 
शासनाने महसूल वाढविण्यासाठी दारूचे दुकान लाँकडाउनमध्ये चालू करण्यास सांगितली पण लोकांनी दारुच्या दुकानासमोर गर्दी करून कोरोना वाढविण्यास मदत केली , त्याचबरोबर दारू प्राशन करून लोक घरामध्ये न थांबता रस्त्यावर फिरताना दिसत होते. त्याचबरोबर दारू पिऊन घरच्या सोबत व  शेजार्यासोबत वाद करताना आपणास दिसतील. पण हे सर्व गोष्टी शासनाच्या लक्षात आल्या आणि दारूचे दुकान बंद केले. हा चांगला निर्णय शासनाने घेतला मी त्यांचे स्वागत करतो. 
लाँकडाऊनमुळे प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक नियोजन बिघडणार आहे. कारण व्यवसाय, नोकरी धंद्यामध्ये मोठे घसरण होणार आहे . नोकरदार आपले बँकेचे ई. एम .आय. भरण्यास परेशान होणार आहे तर उद्योग धंदे वाले उद्योगामुळे, शेतकरी शेतमालाला भाव नसल्यामुळे, कामगार काम नसल्यामुळे परेशान राहणार आहे. या प्रश्नाचा विचार करून मा. पंतप्रधान , नरेंद्र मोदीजी ने  नवीन योजना चालू करण्याचे आश्वासन दिले आहे .ही योजना किती काळ टिकेल आणि या बेकारीचा महासूर थांबण्यास   किती मदत होईल हे आपल्याला येणारा काळच ठरविल. 
*धार्मिक परिस्थिती बदल*
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व धर्माच्या प्रार्थना स्थळांना बंद केले आहे. कारण प्रार्थना करण्यासाठी जास्त लोक एकत्र जमा होऊ नये.  गर्दी जमा झाली तर कोरोना रोगप्रसार होऊ शकतो. 
आज देव-देवता मंदिरात बंद झाल्यामुळे माणूसच देव झाला आहे .डॉक्टर ,नर्स ,पोलीस, सैनिक ,आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी ,शिक्षक खऱ्या अर्थाने देवदूत झाले आहेत .आपल्या जीवाची पर्वा न करता इतरांची जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामध्ये काही पोलीस ,डॉक्टर ,नर्सेला कोरोना विषाणूची लागण झाली आहे पण कुणीही भयभीत झालेले नाहीत आणि आपल्या कर्तव्यापासून दूर गेले नाहीत . याचप्रमाणे समाजातील गोरगरीब, भिकारी, वाटसरू आदीना समाजसेवक अन्न ,वस्त्र ,आणि निवारा मुक्तमध्ये देण्याचे काम करीत आहे. खऱ्या अर्थाने देव मंदिरात, मज्जित, चर्च आदी ठिकाणी नाही तो माणसात आहे याची प्रचिती आज कोरोना विषाणूमुळे जाणवत आहे.   या प्रसंगी मला साने गुरुजीच्या शब्दाची आठवण होत आहे
"खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे"
आज जगाला प्रेमाची, आपुलकीची ,माणूसकीची गरज आहे .ती सर्व जगाला भारतीयांनी दाखवून दिले आहे.
 *राजकीय परिस्थितीत बदल*
कोरोना विषाणूमुळे जगातील जवळपास सर्व देश घायाळ झाले आहेत .प्रत्येक देशाचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष चिंतित आहे. आपली प्रजा  वाचली पाहिजे यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील यावर सर्व राजकीय पक्षांचे नेते विचार विमर्श करीत आहेत.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी चे अभिनंदन व कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कारण इतर देशाची परिस्थिती पाहून आपल्या देशात उपाययोजना  आखण्यात आल्या व राबविलेल्या. मा. पंतप्रधान मोदीजीना देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची सहायता लाभत आहे .अशा या आणीबाणीच्या काळात आपल्या देशाचे व राज्याचे राजकीय स्थिती चांगले आहे सर्व राजकीय पक्ष आपले वैयक्तिक वैमनस्य सोडून कोरोनाच्या विरोधात लढत आहेत. 
गावाकडे एक गंमत निर्माण झाली आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, कामगारांना मोदीजींने त्यांच्या बँक खात्यावर पैसे टाकले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण म्हणतो की, मोदींचे पैसे आले आणि प्रत्येकाच्या चेहर्‍यावर या पैशामुळे क्षणिक आनंद दिसत आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने जगाला ' विश्व कुटुम्बकम' संस्कृतीची ओळख करून दिली आहे .मा.मोदीजी ने अमेरिकासह  अन्य देशालाही कोरोना विषाणूवर  काही प्रमाणात उपयोगी येणाऱ्या औषधीचा पुरवठा केला आहे .यामध्ये आपल्या देशाचा विचार करून औषधाचा पुरवठा केला आहे. त्यामुळे खरंच आज भारत देश श्रीरामाची, बुद्धाची ,महावीर जैन, संत कबीर, संत तुलसीदास, महात्मा गांधी, आंबेडकर व आता मोदी यांची भूमी म्हणून ओळखली जाईल असे मला वाटते. कारण या सर्व महात्म्याने जगाला आणीबाणीच्या काळामध्ये सुख ,शांती, समता, बंधुत्व, मित्रत्वाची, सहकार्य, समन्वयाची शिकवण  दिली आहे. आणि ती आज मा.नरेंद्र मोदीजी सर्व जगाला देण्याचे काम करीत आहेत.
  *शैक्षणिक परिस्थिती बदल*
कोरोना विषाणूमुळे जगातील सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. शाळा, महाविद्यालय ,  विद्यापीठाच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. विद्यार्थी, संशोधक, शिक्षक घरी बसून अध्ययन अध्यापनाचे काम करीत आहेत. विद्यार्थी व शिक्षक आजच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ऑनलाइन अध्ययन-अध्यापन करीत आहेत.  प्राध्यापक नवनवीन विषयावर वेबिनाराचे आयोजन करीत आहे . प्राध्यापक वेगवेगळ्या वेबिनारला  उपस्थित राहत आहेत. तरीही काही  शिक्षक कोरोना ड्युटी करीत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजन करण्यासाठी शिक्षण बोर्ड, विद्यापीठ ,यूजीसी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग घेत  आहेत. शैक्षणिक नवीन धोरण ठरवीत आहेत. 
कोरोना विषाणूमुळे शिक्षण व्यवस्थेत   टेक्नॉलॉजीची मोठी क्रांती होणार आहे .ती म्हणजे  प्रत्येक वर्गासाठी आता ऑनलाइन शिक्षण हे आपल्याला दिसणार आहे .या ऑनलाईन अध्ययन अध्यापनाच्या टेक्नॉलॉजीमध्ये काही समस्या आहेत त्या समस्या दूर करण्याचे काम आयटीतज्ञ सध्या करीत आहेत .त्यामुळे ही शिक्षण व्यवस्थेत नवीन पद्धत आता अध्यापनाची रूढ होणार आहे.
*साहित्यिक परिस्थितीत बदल*
कोरोना विषाणूमुळे साहित्यिक  क्षेत्रात बदल होणार आहे. संवेदनशील लेखक, कवी आपल्या साहित्याच्या माध्यमातून कोरोना विषयांवर अनेक विपुल साहित्य सृजन करीत आहेत.
'साहित्य समाजाचा आरसा असतो' या उक्तीप्रमाणे साहित्यकार ने  सर्वसाधारण व्यक्ती ते राष्ट्राध्यक्षा पर्यंत संवेदना आपल्या कोरोना साहित्यामध्ये प्रकाशित करण्याचे काम केले आहे. साहित्यकरांना  विषाणूमुळे वेळ भेटला आहे .हा वेळ साहित्य सृजन साठी घालवत आहेत. त्यामुळे साहित्य क्षेत्रात  लाँक डॉऊनच्या काळात जगातील प्रत्येक भाषेत बदललेले साहित्य लिहिले गेले आहे .या विषाणूमुळे साहित्यक्षेत्रात कोरोना साहित्यप्रवाह निर्माण होणार आहे. कारण ज्यावेळी जगामध्ये मोठे युद्ध, संकट आले त्यावेळेस साहित्यात या कालखंडाचा साहित्यिक प्रवाह निर्माण झालेला आहे. कोरोना विषाणू  साहित्य क्षेत्रामध्ये एक नवीन संधी घेऊन जन्मास आला आहे. 
वरील विवेचनातून असे स्पष्ट होते की ,जगासमोर, देशासमोर अनेक समस्या,आव्हाने निर्माण झाले आहेत, पण या आव्हानाला मानवजात एक संधी म्हणून पाहिले तर जगाचा विनाश होण्यापेक्षा प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही .जीवसृष्टी जीवित राहील पण यासाठी सर्व जनतेने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली जीवनशैली निर्माण करून स्वच्छता पाळुन,सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
गो- कोरोना! गो- कोरोना!! गो- कोरोना !!!

प्रा. डॉ.गजानन सवने, 
वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदुर ता. अंबाजोगाई जि. बीड.
मो.नं.9421992335
ई-मेल drgajanansawane@gmail.com

2 comments: