* वाढदिवसा निमित्त समाज उपयोगी उपक्रम .
परळी वैजनाथ;- (प्रतिनिधी) वाढदिवस दरवर्षीच येतो, प्रत्येक वाढदिवसाला लहान मोठे कार्यक्रमही होतच असतात. परंतू सुरूवातीपासूनच समाजसेवेसाठी अंग झटकून प्रसंगी स्वत:च्या खिशाला झळ देत समाजसेवा करणारे महाराष्ट्र वीरशैव सभेचे तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक महादेव दत्ताप्पा इटके यांनी आपला वाढदिवस वेगळयाच पद्धतीने साजरा केला. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने अनेक दुर्लक्षित घटकांना जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याने महादेव इटके यांनी शहरातील विविध क्षेत्रात असलेल्या शंभर वासुदेव, विधवा, महिला कामगार, मुस्लीम महिला यांना अन्नधान्याचे किट वाटप केले. विशेष म्हणजे कोणाची शिफारस न घेता थेट घरपोहच ही सेवा देण्यात आली आहे.
महाराष्ट्र वीरशैव सभेचे तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक महादेव दत्ताप्पा ईटके यांच्याकडून लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या 100 वासुदेव, विधवा महिला कामगार व मुस्लिम समाज साठी शिरकूर्म साहित्य गरजू कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूंसह दैनंदिन गरजेच्या किटचे वाटप करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दोन टप्प्यात मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ होता. परंतु, तिसऱ्या टप्प्यात ओघ ओसरत असताना चौथ्या टप्यात महादेव ईटके यांच्या मदतीमुळे गरजू कुटूंबियांना मोठा दिलासा मिळला आहे.
कोरोनाच्या संकटाशी संपुर्ण राज्य लढा देत असतांना हातावर पोट असणाऱ्या गोरगरिब गरजूंसाठी अन्नधान्य आणि दैनंदिन गरजेच्या दोन महिनाभर पुरतील एवढ्या वस्तू पुरवत ईटके यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.या वेळी जेस्ट नेते दत्तापा ईटके दयानंद स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ सचिव प्रभाकरअप्पा ईटके, मदन इंगळे सर आदी उपस्थित होते कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून कामगार, मजूर, सामान्य कुटूंब घरामध्ये बसून आहेत. हाताला काम नाही अन पोट हातावरचे अशा परिस्थितीत या कुटूंबियांसमोर संकटाचा डोंगर उभा राहिला आहे.
प्रत्येक जण एकमेकाला या कठीण परिस्थितीमध्ये मदतीचा आधार देत होता. गेली 60 दिवस या मदतीवरच हजारो कुटूंब आपला उदरनिर्वाह भागवत होते. मात्र पुन्हा लॉकडाऊन वाढल्याने आता काय खायचे? असा प्रश्न निर्माण झाला. आतापर्यंत अनेक सामाजिक संस्था, संघटना राजकीय पक्ष, नेते, लोकप्रतिनिधींनी गरीबांना मदतीचा हात देत त्यांची काळजी वाहिली.
पण लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने मदतीचा ओघ काहीसा मदांवला, त्यामुळे गरीबांच्या पोटाचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला. अशा शेकडो गरजूंसीठी भाजप माजी नगरसेवक महादेव ईटके पुन्हा एकदा धावून आले. त्यांनी 100 गरीब, सामान्य कुटूंबाना दोन महिना पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूच्या सामानाचे कीट वाटप केले.
No comments:
Post a Comment