Saturday, May 9, 2020

ना.धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठाणच्या वतिने स्व.मोहनलालजी बियाणी अन्नक्षेत्रला मदत.


* महिनाभराचे अन्नधान्य अन्नदान महायज्ञाला येणार गती.

परळी । प्रतिनिधी
स्व.मोहनलालजी बियाणी अन्नक्षेत्रच्या वतीने दि.१२ डिसेंबर पासून अविरतपणे अन्नदान महायज्ञ राबविण्यात येत आहे. कोरोना आजाराचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषीत केला असल्याने अनेक निराधार आणि निराश्रीतांसह सेवा बजावण्यासाठी अडकून पडलेल्या गरजू लोकांना जेवण पुरवण्यात येत आहे. गेल्या ४६ दिवसांपासून ठिकठिकाणी जावून जेवणाचे डब्बे व शुध्द आणि फिल्टर्ड पाण्याच्या बाटल्या पोहोच केल्या जात आहेत. यामुळे अडचणीत आलेल्यांना पोटाला अन्न मिळत आहे. अन्नछत्रच्या महायज्ञाची दखल घेत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. पुढील एक महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य पाठवून दिले आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अनेक चांगल्या गोष्टींची त्यांच्याकडून दखल घेतली जात आहे. दै.मराठवाडा साथीचे संपादक चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेल्या स्व.मोहनलालजी बियाणी अन्नक्षेत्रच्या अन्नदान महायज्ञाला त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. महिनाभर गरजूंपर्यंत जेवण पोचवता येर्ईल एवढे अन्नधान्य ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानकडून पाठवून देण्यात आले आहे. गहू, तांदूळ, डाळ, साखर, तेल या वस्तू अन्नक्षेत्रला महिनाभर पुरतील एवढ्या प्रमाणात देण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊन घोषीत करण्यात आल्यापासून स्व.मोहनलालजी बियाणी अन्नक्षेत्रच्या वतीने गरजूंना जेवण देण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अविरतपणे अन्नक्षेत्रच्या वतीने गरीब आणि गरजू लोकांच्या जेवणाची काळजी घेतली जात आहे. अनेक उपक्रम मागील काळात राबविण्यात आले आहेत. ना.धनंजय मुंडे यांना राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य कॅबिनेट मंत्रीपद भेटल्याच्या प्रित्यर्थ सलग नऊ दिवस परळीत शेकडोंसाठी स्नेहभोजन सप्ताह राबविण्यात आला होता. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पत्रकार, पेपर वितरक, नगर पालिका स्वच्छता कर्मचारी, विविध प्रशासकीय कार्यालयांचे कर्मचारी यांना या सप्ताहात सप्रेम स्नेहभोजन देण्यात आले. याचबरोबर गेल्या अनेक महिन्यांपासून अन्नदानाचा अविरत महायज्ञ राबविण्यात येत आहे. ना.धनंजय मुंडे यांनी अन्नक्षेत्रला मदत पाठविल्यामुळे अन्नदानाचे हे महान कार्य अधिक गतीमान केले जाणार आहे.

No comments:

Post a Comment