वरोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्या शेतकर्यांच्या शेतात अजून पर्यंत पंचनामे करा साठी कुणीच पोहचले नाही
या संबंधी आज तहसीलदार साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिले. अनेक शेतकर्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेत खरडून गेल आहे. शेतकरी संकटात सापडला आहे परंतु अजून पर्यंत कुणीही पंचनामे करा साठी शेतात पोहचले नाही अनेक वेळा तसे निवेदन दिले अधिकार्यांना सूचना करून संबंधित अधिकारी कृषी सहाय्यक, पटवारी, ग्राम सेवक अजून पर्यंत बांधावर पोहचले नाही.
शेतकरी आधीच कर्ज बाजारी असून अजून अस्मानी संकट उभे राहिले आहे त्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकर्यांना न्याय द्यावा.
अभिजित कुडे (शिवसेना) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांनी केली. विधानसभा अध्यक्ष रविन्द्र भाऊ शिंदे व तालुका प्रमुख दत्ता भाऊ बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना कार्यकर्ते अभिजित कुडे सतत शेतकर्यांच्या अडचणी घेवून तहसीलदार, नायब तहसीलदार, कृषी अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे तरी तात्काळ शेतकर्यांच्या शेतात जावून पंचनामे करावे अशी मागणी केली. अनेक शेतकर्यांच्या तक्रारी येत आहे. शेतकरी कॉल करुन युवा सेना ला आपल्या अडचणी सांगत आहे. इतके दिवस होऊन देखील अधिकारी सुस्त बसले आहेत. शेतकर्यांच्या बांधणार जावून पंचनामे करावे अन्यथा शिवसेना कार्यपद्धती ने काम करण्यात येईल असा इशारा अभिजित कुडे यांनी दिला.
No comments:
Post a Comment