Saturday, July 15, 2023

हिंगोलीत ट्रक बस मध्ये भीषण अपघात, २० प्रवासी जखमी.


हिंगोली (प्रतिनिधी)   हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील वगरवाडी गावाजवळ बस व ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे, या अपघातात बस मधील प्रवासी जखमी झाले आहेत तर वाहकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच या रस्त्याने जाणारे खासदार हेमंत पाटील यांनी बसमधील जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे आहे, दरम्यान अपघाताच्या घटनेनंतर दोन्ही वाहने रस्त्यावर असल्याने या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती, पोलिसांनी आता ही वाहने हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू केली आहे.

No comments:

Post a Comment