Sunday, July 30, 2023

बीडमध्ये केमिकल पावडर घेऊन जाणारा मालवाहू ट्रक पलटी. एक जण जखमी.


बीड (प्रतिनिधी) : बीडमध्ये केमिकल पावडर घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात भरधाव ट्रक पलटी झाल्याने एक जण जखमी झाला आहे. हा अपघात धुळे - सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या पाडळसिंगी टोलनाका परिसरात झाला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती कळताच महामार्ग रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेत विशाल डोंगर, यशवंत शिंदे यांनी प्रथमोपचार केले. तर यावेळी प्रतिक कदम, अंबादास जाधव, महादेव पवार, आकाश फुलझळके, मारुती चित्रे यांनी ट्रक रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

No comments:

Post a Comment