Saturday, July 15, 2023

बीड जिल्ह्यात खरीपाच्या 60 टक्के पेरण्या पूर्ण पण पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत दुबार पेरणीचे संकट.

बीड (कांतीकारी साथी रिपोर्ट) बीड  जिल्ह्यात यावर्षी उशिरा मान्सून दाखल झाल्याने पेरण्या उशिरा झाल्या यातच गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने उगवून आलेले पीक करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांसमोर आहे.

तसेच दुबार पेरणी करावी लागते की काय यामुळे शेतकरी चिंतेत आहे. 11 जुलै पर्यंत कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार केवळ 60 टक्के क्षेत्रावरच पेरणी झालीय. बीड, वडवणी, परळी, धारूर आष्टी आणि पाटोदा या तालुक्यात 60 मिलिमीटर पेक्षाही कमी पाऊस झाला. येत्या तीन ते चार दिवसात दमदार पाऊस न झाल्यास ओल नसलेल्या जमिनीत दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झालीय.

वासनवाडी गावातील शेतकरी सुंदर लांडे या शेतकऱ्यांना मान्सूनचा पाऊस पडतात कापसाची लागवड केली. कापूस उगवून आलेला आहे, मात्र आता पाऊस न पडल्याने कापूस जळून चालला आहे. म्हणून शेतकऱ्याला चिंता सतावत आहे. अगोदरच 60 ते 70 हजार रुपये खर्च केलाय, पुन्हा दुबार पेरणीला खर्च करायचा कसा ? असा प्रश्न सुंदर लांडे यांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यात अकरा जुलैपर्यंत झालेला पेरा

कापूस लागवड - 1,95, 373 हेक्टर

सोयाबीन पेरा - 2, 02, 232 हेक्टर,

बाजरी पेरा - 20,114 हेक्टर,

मका - 2,788 हेक्टर,

तूर - 22, 870 हेक्टर,

उडीद - 21,538 हेक्टर

दरम्यान गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच पेऱ्याची टक्केवारी कमी राहिल्याचं चित्र यावरून दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment