Saturday, July 15, 2023

२५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; अपघात की घातपात? पोलीस तपास सुरू.

गेवराई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक गंभीर गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत. बीडमधून अशीच एक घटना समोर आली आहे. बीडच्या गेवराई शहरात 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या गेवराई शहरात 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील संजय नगर भागात असणाऱ्या एका लिंबाच्या झाडाखाली हा मृतदेह आढळला आहे. सचिन साहेबराव चव्हाण वय 25 रा.सुशी तांडा ता.गेवराई असे मृत तरुणाचे नाव आहे.

या घटनेची माहिती कळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, घटनेची माहिती घेत पंचनामा केला. दरम्यान मयत सचिन चव्हान याचा खून झालाय की आत्महत्या केली ? याचा तपास गेवराई पोलीस करत आहेत.


No comments:

Post a Comment