जालन्यातील औद्योगिक वसाहतील मेटारोल्स इस्पात प्रा. लि. कंपनीतून २७ जानेवारी २०२१ ते ३० मार्च २०२२ या काळात संशयित सुधाकर शिवराम सुळकुडे, स्वप्निल सुधाकर सुळकुडे या कोल्हापूरच्या व्यापाऱ्यांनी या १ कोटी ४१ लाख २१ हजार ४४६ रूपये किमतीच्या लोखंडी सळ्या खरेदी केल्या होत्या. काही दिवसांनंतर कंपनीने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास वारंवार टाळाटाळ केली. त्यानंतर कंपनीतील रामचंद्र ज्ञानेश्वर शिंगणे यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा ठाण्यात दोन्ही व्यापाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याचं व्यापाऱ्यांनी औद्योगिक वसाहतीत असलेल्या कालिका स्टील कंपनीतूनही संशयित आरोपी व्यापारी सुधाकर सुळकुड, राहुल बागेवाडी, ज्योत्सना पवार यांनी संगनमत करून २ कोटी २९ लाख ५२ हजार १४१ रूपये किंमतीचा लोखंडी सळईचा माल खरेदी केला होता. परंतु, त्यांनी पैसे देण्यास वारंवार टाळाटाळ केल्याने कंपनी प्रशासनाची फसवणूक झाल्याचे लक्षात येतात प्रशासनाच्यावतीने चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणी पोलिसांनी कोल्हापूर संसयित आरोपी यांना ताब्यात घेऊन न्यायालाय समोर हजर केले असताना न्यायाल्याने दोन्ही व्यापाऱ्यांना सोमवार प्रयन्त पोलिस कोठडी सुनावली आहे. कोल्हापुरातील या व्यापाऱ्यांनी अनेक स्टील कंपन्यांची फसवणूक केल्याचे धक्कादायक बाबी समोर आली आहे.
No comments:
Post a Comment