*सोमवारी वीरशैव समाजाच्या वतीने सत्कार.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथील रहिवासी सर्वेश सुभाष नावंदे याची इंडियन एअर फोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड झाल्याबद्दल परळी वीरशैव समाज व महाराष्ट्र वीरशैव सभातर्फे श्री गुरुलिंग स्वामी मठ, बेलवाडी येथे दुपारी 12.30 वाजता उद्या सोमवारी सत्कार करण्यात येणार आहे.
सर्वेश सुभाष नावंदे राहणार परचुंडी तालुका परळी येथील विरशैव बांधव आहे.इ 1ली ते 12 वी पर्यंतचे शिक्षण व्हीं पी एम एस स्कूल, पुणे येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण मॉडर्न कॉलेज गणेश खिंड, पुणे येथे बी.एस.सी. मॅथ्स ने पदवी घेतली. ते करत असतानाच त्याने पहिल्याच वर्षी एनसीसी हेडकॉटर, बालभारती समोर एस बी रोड, पुणे येथे एनसीसीसाठी प्रवेश घेतलस. बीएससी मॅथ्सच्या द्वितीय वर्षात असताना त्याची आर डी सी ( रिपब्लिक डे कॅम्प ) साठी महाराष्ट्राच्या संघामध्ये बेस्ट कॅडेट एअर विंग म्हणून निवड झाली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे तीन महिन्याचा प्री आर डी सी कॅम्प केला व दिल्लीमध्ये 26 जानेवारी २०१८ च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राची संघ सहभागी झाला.
भारतातून आलेल्या सर्व राज्याच्या कॅडेट्स मधून त्याला राष्ट्रीय स्तरावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोल्ड मेडल बॅटन देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच भारताचे एनसीसी चे प्रमुख यांचे हस्ते बेस्ट कॅडेट ट्रॉफी ही देण्यात आली. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयामार्फत युथ एक्सचेंज प्रोग्रॅम अंतर्गत भारताची टीम रशिया येथील संरक्षण दलामध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती. रशियाच्या डिफेन्समध्येही त्याने डिफेन्सच्या तंत्राचा सराव केला आणि तिथे गेल्यानंतर ही सर्वेशने बेस्ट कॅडेट ची ट्रॉफी मिळवली. त्यानंतर पदवीच्या शेवटच्या वर्षात तो एनसीसी C (सी) सर्टिफिकेट पास झाला.
बीएससी मॅथ्सची पदवी मिळवल्यानंतर त्याने पुणे विद्यापीठांमध्ये एक वर्षाचा डिझास्टर मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला आहे. हे करत असताना त्याने एअर फोर्स एपटीट्यूड टेस्ट आणि सीडीएस या यूपीएससी कडून घेण्यात येणाऱ्या परिक्षेत त्याने यश संपादन केले.
तसेच एनसीसीचे सी सर्टिफिकेट पास झाल्याने त्याला डायरेक्ट एस एस बी ( सर्विस सिलेक्शन बोर्ड ) मध्ये संधी मिळाली या पाच दिवसाच्या मुलाखतीमध्येही त्याने यश संपादन केले.
या परीक्षांमध्ये यश मिळवून त्याची *इंडियन एअर फोर्स अकॅडमी दुंडीगल हैदराबाद येथे फ्लाईट कॅडेट म्हणून निवड झाली. दि. 17 डिसेंबरला २०२२ रोजी त्याची पासिंग आऊट परेड हैदराबाद येथील इंडियन एअर फोर्स अकॅडमी झालेली आहे. दोन जानेवारी 2022 रोजी त्याची *इंडियन एअर फोर्सचा फ्लाईंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली*. त्याला विशेष ट्रेनिंग साठी हकीमपेठ, हैद्राबाद येथील एअर फोर्स स्टेशन मध्ये नियुक्ती देण्यात आली.
हैदराबाद हकीमपेठ येथील विशेष ट्रेनिंग संपून त्याला पहिली नियुक्ती उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील इंडियन एअर फोर्स विशेष केंद्रामध्ये नियुक्ती देण्यात आली. दिनांक एक सप्टेंबर 2023 रोजी तो प्रयागराज (उत्तर प्रदेश ) येथे रुजू झालेला आहे.
या कार्यक्रमासाठी सर्व वीरशैव समाजातील सर्व बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वीरशैव समाज परळी व महाराष्ट्र वीरशैव सभा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment