Saturday, February 18, 2023

ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त भव्य चित्र प्रदर्शन संपन्न.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाशिवरात्रीचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय ओम शांतीच्या वतीने आज शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी श्री जगमित्र नागा मंदिर च्या समोर व्यसनमुक्ती, शिव व आत्म्याचे भव्य चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
आज शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने भव्य व्यसनमुक्ती शिव व आत्म्याचे चित्र प्रदर्शन चे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ्.विवेक दंडे ,शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर,  ज्योती बहेनजी,दीनदयाळ बँकेचे उपाध्यक्ष राजेश्वर देशमुख, ज्येष्ठ नेते राजाभाऊ दहिवाळ शिवसेनेचे शहर संघटक संजय कुकडे, सुनील सोळंके ,विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास नागरिक व भाविक भक्तांची मोठी उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment