Saturday, February 18, 2023

भाजपच्या महिला नेत्याच्या पतीची आत्महत्या; माजी आमदाराला धरले जबाबदार.


अकोला (प्रतिनिधी)अकोला शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे भाजपच्या नेत्या नयनाताई मनतकर यांचे पती अविनाश मनतकर यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरच्या अजनी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अविनाश मनतकर यांच्या जवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये मनतकर यांनी आपल्या आत्महत्येला भाजपचेच माजी आमदार चैनसुख संचेती यांना जबाबदार धरले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अविनाश मनतकर यांनी गुरुवारी दुपारी अजनी भागात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली.
यावेळी त्यांच्या मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात त्यांनी बुलढाण्यातील भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यावर या सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संचेती यांच्यामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचं मनतकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिल्याने खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment