विविध प्रलंबित मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह झालेल्या बैठकीतील सकारात्मक चर्चेनंतर सरकारकडून लेखी आश्वासन देण्यात आलेले नाही.त्यामुळे सोमवारपासून कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील इतर जिह्यांतील विद्यापीठे व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्यांच्या विविध मागण्या या खूप काळापासून प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी १५ फेब्रुवारीला काळ्या फिती लावून काम केले, तर १६ फेब्रुवारीला एक दिवसाचा लाक्षणिक संप केला.
त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांसोबत समितीच्या बैठकीत विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊनही सरकारकडून लेखी आश्वासन मिळाले नाही. राज्य सरकार मागण्यांकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक होऊन कामबंद आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या आंदोलनाचा फटका २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षांनाही बसणार आहे.
No comments:
Post a Comment