परळी (प्रतिनिधी)- विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटी संचलित पोदार जम्बो किड्स, प्रिया नगर येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी स्कूल मध्ये वेगवेगळे सांस्कृतीक कार्यक्रम साजरे केले जातात. मराठी भाषेचा विकास व प्रसार व्हावा या दृष्टीकोनातून विवेकानंद यूथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्याक्षा सौ. उषाताई किरण गिते यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पोदार जम्बो किड्सच्या विद्यार्थ्यांनी मराठी नृत्य , संतांच्या व साहित्यिकांच्या वेगवेळ्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. कवी कुसुमाग्रज यांची जयंती आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करतो. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment