*वडिलांना भेटायला दगडवाडी येथे आला होता मुलगा.
गणेशचे वडिल अनेक वर्षांपासून दगडवाडी येथे सालगडी म्हणून काम करतात. काही दिवसांपूर्वी गणेश वडिलांना भेटण्यासाठी दगडवाडी येथे आला होता. आज माजलगाव कालव्याच्या उजव्या कालव्यात तो पोहायला गेला होता.
*पाण्याचा अंदाज न आल्याने कालव्यात बुडाला
मात्र कालव्यात पाणी सोडण्यात आल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. अग्नीशमन दल मुलाचा पाण्यात शोध घेत आहे.
गणेशच्या पश्चात एक भाऊ, एक बहिण आणि आई-वडिल असा परिवार आहे. मुळचे परभणी जिल्ह्यातील रहिवासी असलेले गणेशचे वडील काही अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यातील दगडवाडी येथे सालगडी म्हणून काम करत आहेत.
गणेशला पाण्यात बुडताना पाहून गावकऱ्यांनी त्याला वाचण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अग्निशामक विभागाकडून शोधकार्य सुरु आहे.
No comments:
Post a Comment