मुंबई(प्रतिनिधी) शुक्रवारी निवडणूक आयोगानं मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे खरी शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब झालं आहे. पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला मिळाल्यानं शिंदे गटात उत्साहाच वातावरण आहे.
पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता शिदे गटाने आपला मोर्चा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे वळवल्याचं दिसून येत आहे. राज्यात नक्कीच राजकीय भूकंप होईल, मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही आमदार भाजप आणि शिंदे गटात दिसतील असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
.jpeg)
No comments:
Post a Comment