Monday, February 20, 2023

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती उत्साहात साजरी.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांची  जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.
दरवर्षी  प्रमाणे  या ही वर्षी रविवार,१९ फेब्रुवारी रोजी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मध्ये  छत्रपती शिवाजी महाराजांची  जयंती  मोठ्या थाटामाटात साजरी केली गेली. 
महाराजांच्या ३९३ व्या शिवजयंती चे औचित्य साधून प्रशालेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच पोवाडा गायन व महाराजांच्या कारकिर्दीतील घडलेल्या रोमहर्षक प्रसंगावर आधारीत चित्रकला तसेच तक्ते बनवणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये प्रशालेतील हरहुन्नरी विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. 

या कार्यक्रमासाठी विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई किरण गित्ते  तसेच प्रशालेचे प्रेरणास्रोत व मार्गदर्शक श्री.किरण गित्ते साहेब सचिव नगरविकास,सार्वजनिक बांधकाम,उद्योग,पर्यटन विभाग त्रिपुरा यांचे मार्गदर्शन लाभले असून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विठ्ठल तुपे यांनी  विद्यार्थ्यांना वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच पोवाडा गायन, शालेय सजावट  अशा विविध स्पर्धा आयोजन करून भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे  महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपुर्ण भारतासाठी त्यांचे योगदान,पराक्रम, सर्वधर्मसमभाव, स्त्री पुरुष समानता अशा अनेक गोष्टींची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment