*12 वी बोर्ड परीक्षेला सुरुवात होत आहे. परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांजवळील झेरॉक्स सेंटर बंद राहणार आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये 101 केंद्रावर 38 हजार 929 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र बीड जिल्ह्यात देखील अनेक परीक्षा केंद्रे ही संवेदनशील आहेत. त्या ठिकाणी कॉपी सारखे गैरप्रकार होण्याची शक्यता असते. त्या परिसरात असणाऱ्या झेरॉक्स सेंटरमुळे कॉपी करण्याचे प्रमाण अधिकच वाढते.
*झेरॉक्स सेंटर बंद
परीक्षेत गैरप्रकार होताना बऱ्याचदा परीक्षा केंद्रजवळ असणाऱ्या झेरॉक्स सेंटरचा वापर होतो. अनेकदा पुस्तक, नोट्स यांच्या मायक्रो झेरॉक्स तयार केल्या जातात. अनेक विद्यार्थी ते परीक्षेच्या ठिकाणी घेऊन जातात. या झेरॉक्सची साईज छोटी असल्यामुळे तपासणीमध्ये देखील ते सापडत नाही. त्यामुळेच असे गैरप्रकार घडू नयेत यासाठी बीडमधील माध्यमिक शिक्षण विभागाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सर्व केंद्राजवळ असणारी झेरॉक्स सेंटर परीक्षा काळात बंद ठेवावी लागणार आहेत.
*भरारी पथकाचे राहणार लक्ष.
No comments:
Post a Comment