Thursday, November 24, 2022

मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी घटना.हनुमानाच्या मूर्तीची विटंबना समाज कंटकांने मूर्तीचे तुकडे करून फेकले.


*मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी घटना आली उघडकीस - नागरिकांत रोष दोषी व्यक्तीला ताबडतोब अटक करण्याची मागणी. 

राजुरा - हिंदु धर्मात मार्गशीर्ष महिन्याला महत्वाचे स्थान असून ह्या महिन्यात अनेक व्रतवैकल्य तसेच धार्मिक स्थळी यात्रांचे आयोजन केल्या जाते. ह्या महिन्यात हनुमानाच्या उपासनेला विशेष महत्व असते. मात्र ह्याच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी हिंदुंच्या आस्थेवर घाला घालण्याचा प्रकार समोर आला असुन चंद्रपूर बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गावरील सैनिक शाळेच्या समोर असलेल्या भिवकुंड नाल्याच्या काठावर असलेल्या हनुमान मंदिरात अज्ञात इसमाने धुडगुस घालुन मूर्तीची विटंबना केली.

अज्ञाताने केवळ विटंबनाच केली नसुन मंदिरातील मुर्तीची तोडफोड करून मूर्तीचे तुकडे फेकुन दिल्याचे उघडकीस आले आहे. सदर घटना रात्रीच्या वेळी घडली असल्याची शक्यता असुन मंदिराची विटंबना झाल्याचे सकाळी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांच्या लक्षात आले. हनुमान मुर्तीची तोडफोड झाल्याचे कळताच लगतच्या विसापूर, चंद्रपूर व बल्लारपूर येथिल हनुमान भक्तांनी तसेच विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, भाजपा कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असुन हिंदुंच्या श्रद्धेवर घाला घालणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काही लोकांच्या मते महामार्ग रुंदीकरणासाठी मुद्दाम ही घटना घडवुन आणली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी ह्या दृष्टीनेही तपास करून जर ह्यात तथ्य असेल तर त्या कांत्रादरावर कठोर कारवाई व्हावी अशीही मागणी पुढे आली आहे.

No comments:

Post a Comment