Tuesday, November 22, 2022

दै.द.सोमेश्वर साथी लोकनिर्माण राष्ट्रीय पुरस्कार - २०२२ विधायक कार्यासाठी ची उर्जा.-- अनिल मोरे.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)लोकजीवनात विधायक विचारातून  लोकनिर्माण कामी समाज सुधारकांनी चांगूलपणाची कास धरत सजग समाज बांधणीचे कार्य करावे.संतवाणी माणसातील सत्य, शिव,सुंदरतेला साद घालत अन्यायाच्या विरोधात न्यायासाठी लढण्याचे बळ प्रदान करीत समाज सेवेची सवय अंगी बाणण्यासाठीची शिकवण देते.संतांनी स्वार्थ बाजूला सारत लोकसेवेच्या माध्यमातून लोकसमस्यांचे निराकरण करण्यासाठी  लोकसेवकाची भूमिका सहज साकारली.संतांचे आचरण माणसातील माणुसकीचे दर्शन घडवत
माणसातील देवपणाची अनुभूती सिध्द करणारी विश्वातील आदर्श जीवनरीत होय.दै.द.सोमेश्वर साथी लोकनिर्माण राष्ट्रीय पुरस्कार 2022 तुम्हा सर्वांना सन्माना बरोबरच जबाबदारीची जाणिव करुन देत चांगल्या समाज कार्यासाठीची प्रेरक प्रेरणा असल्याचे प्रतिपादन संतसाहित्याचे अभ्यासक तथा सिनेअभिनेते अनिल मोरे यांनी केले.
          रविवार दि.२० नोव्हेंबर २०२२ रोजी.दै.द सोमेश्वर साथी च्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सी.टी.पॅलेस परभणी येथे आयोजित कला,क्रिडा, साहित्य, वैद्यकीय, प्रशासकीय, शैक्षणिक, उद्योग, विविध सेवाक्षञे, सामाजिक,सांस्कृतिक आदी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ३० व्यक्तींना, सचिन साखरे  युवा उद्योजक तथा पत्रकार, नारायण माधवराव मुंडे उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते, श्रीकांत भास्करराव चाटे उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते, अविनाश वासुदेवराव वाघीरकर पत्रकार तथा सामाजिक कार्य,ह भ प भागवताचार्य रामायणाचार्य बापूसाहेब महाराज खवणे अध्यक्ष ज्ञानाई गुरूकुल सेलू, सय्यद मुजाहिद लतीफ ज्युनियर इंजिनियर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अंबाजोगाई, गोविंद महाराज केंद्रे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते, बापूराव बंडू तात्या किशनराव गित्ते सामाजिक कार्यकर्ते, संगीताताई भाऊसाहेब जामगे सामाजिक कार्यकर्त्या, डॉ वर्षा पूनवटकर शिक्षाविद साहित्यिक वर्धा, डॉ गणेश श्रीधरराव ढवळे सामाजिक कार्यकर्ते, तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य, नर्गिस अली जावेद अली खान उद्योजिका अमरावती,कुलसुम मुनीर फाऊंडेशन पुणे, मुहम्मद जावेद खान अब्दुल रहमान खान शैक्षणिक गंगाखेड, शेख महमुद अमिनोद्दीन सामाजिक कार्य व शैक्षणिक कला सेलू, भूपेंद्र कुमार पटेल शैक्षणिक व सामाजिक कार्य छतीशगड, आशिष अजमेरा शैक्षणिक व सामाजिक कार्य जळगाव, प्रा.सना उल्लाखान समीउल्ला खान शैक्षणिक व सामाजिक कार्य परभणी, डॉ प्रा. प्रल्हाद दत्तराव भोपे शैक्षणिक व सामाजिक कार्य परभणी, डॉ प्रा नसीम बेगम अब्दुल सलीम शैक्षणिक व सामाजिक कार्य परभणी, जमादार इमाम शैक्षणिक व सामाजिक कार्य, सय्यद मोईम कॅप्टन  सामाजिक कार्य  परभणी , दिव्या हनुमान एडायत क्रीडा क्षेत्र परभणी, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई, शैक्षणिक व सामाजिक संस्था अंबाजोगाई, सलमा बानु महंमद फजलोद्दीन शैक्षणिक व सामाजिक कार्य आदी मान्यवरांना आणि संस्थांना  दै.द सोमेश्वर साथी लोकनिर्माण राष्ट्रीय पुरस्कार - 2022 ने सन्मानित करण्यात आले.पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून सिने अभिनेता अनिल मोरे , कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध उद्योजक तथा समाजधुरीण अरुण मराठे यांची उपस्थिती लाभली.व्यासपिठावर वनामकृवि परभणीचे उपकुलसचिव डॉ.सुरेश हिवराळे, वर्धाच्या साहित्यिक डॉ.वर्षा पुनवटकर, समाज सेविका संगीता जामगे,जलपुरुष बाबुराव बस्वंते, स्वागताध्यक्ष अजमत खान आदी अतिथींची उपस्थिती होती.मान्यवरांचे स्वागत दै.द सोमेश्वर साथी परिवारातील संस्थापक, पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक बालासाहेब फड,  अशोकराव दळवे,परभणी प्रतिनिधी नागसेन आटकोरे,लोहा प्रतिनिधी बालाजी नागसाखरे, गोविंद लटपटे, सचिन सोनकांबळे,  अशोक मस्के, वाजेद पठाण यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजमत खान यांनी केले.
             मोबाईल ज्ञानाचा महासागर असून विज्ञानासह ,तंञज्ञानाचा सहज सुंदर परिपूर्ण आविष्कार आहे.त्याचा यथायोग्य वापर केल्यास प्रगती शक्य नव्हे तर अधोगती नक्कीच याचं भान राखत मोबाईलचा माफक वापर करत गैरवापरानं होणारे अनर्थ टाळा असा मौलिक सल्ला अनिल मोरे यांनी दिला.
           वारकरी , वारकरी संप्रदायाचे नियम पाळत आपलं वेगळेपण सिद्ध करत असतो.सामान्य तरीही वारकरी आपल्या ज्ञान साधनेनं  मनमंदिराचे नवनिर्माण करीत असतो . पुरस्काराचे मानकरी या नात्यानं आपल्या हातून उत्तम समाज सेवा घडावी, हा उदात्त विचार वाढीस लागला आहे.
लोकनिर्माणा साठी संतांनी आपले आयुष्य वेचले.स्वार्था शिवाय परमार्थाला प्राधान्य देत अभंग समाज निर्माणाचे कार्य केले,हा विधायक विचार वाढीस लावत हा पुरस्कार आम्हा सर्वांना आत्मिक बळ देणारा असल्याचे मत पुरस्काराचे पुरस्कर्ते पुण्यनगरीचे गोविंद महाराज केंद्रे.यांनी व्यक्त केले.
     पुरस्कार वितरण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी बालासाहेब फड,... यांनी योगदान दिले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
    पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा.अरुण पडघन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आभार  व्यक्त केले.

No comments:

Post a Comment