Thursday, November 24, 2022

भविष्यात दोन्ही शिवसेनेला आधी मित्रपक्ष भाजप-राष्ट्रवादीशीच झुंजावे लागणार.

बीड (प्रतिनिधी) अगोदरच जिल्ह्यात मर्यादीत राजकीय ताकद असलेला शिवसेना पक्ष आता दुभंगल्याने (शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिवसेना : बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या ताकदीला आणखी मर्यादा आल्या आहेत. भविष्यात या दोन्ही पक्षांना निवडणुकांत विरोधकांशी लढण्याअगोदर जागा सोडून घेण्यासाठी ताकदवान असलेल्या भाजप व राष्ट्रवादी या मित्रपक्षांशीस झुंजावे लागणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व भविष्यातील विधानसभा निवडणुकीत हक्काचा वाटा पदरात पाडून घेण्यासाठीच हाती मशाल आणि ढाल-तलवार घेऊन मित्रपक्षांशी अगोदर निकराची लढाई करावी लागणार आहे. (Beed News) एकेकाळी सात विधानसभा मतदार संघ असलेल्या जिल्ह्यात तत्कालिन युतीमध्ये भाजप एका जागेवर तर शिवसेना सहा जागांवर लढायचा. (Marathwada)
त्यानंतर भाजपने राज्यातील इतर जागा शिवसेनेला देऊन जिल्ह्यातील एकेक जागा पदरात पाडून घेतल्या. त्यांतर सहा विधानसभा मतदार संघांच्या वाट्यात पाच मतदार संघ भाजपच्या वाट्याला आणि एकमेव बीड मतदार संघ शिवसेनेला असे. त्या काळात देखील शिवसेनेची राजकीय ताकद मर्यादीत असे. मागच्या नगर पालिका व जिल्हा परिषद निवडणुकांत देखील जिल्ह्यात शिवसेनेची कामगिरी फारच सुमार राहीली. विधानसभेला बीड लढताना देखील पक्षाच्या नाकी नऊ आले.

No comments:

Post a Comment