Thursday, June 23, 2022

अस्थिरोगतज्ज्ञ डाॅ.विजय कट्टे यांना जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.सुरेश साबळे यांनी शिस्तभंगाची कार्यवाही का करू नये याबद्दल मागवला खुलासा :-डाॅ.गणेश ढवळे

___
डाॅ.विजय कट्टे अस्थिरोगतज्ज्ञ जिल्हारूग्णालय बीड यांची दिव्यांग तपासणी बोर्डावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी लेखी मागणी करत आंदोलनाचा ईशारा दिल्यानंतर जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांनी दैनिकात प्रसिद्ध बातम्यांच्या अनुषंगानेच  दि.२३ जुन बुधवार रोजी  दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांगत्व तपासणी,मुल्यमापन,मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन करून दिव्यांग तपासणी बोर्डावरील अस्थिरोगतज्ज्ञ डाॅ.विजय कट्टे  जाणीवपुर्वक आर्थिक लाभापोटी त्रुटी नसतानाही त्रुटी काढून त्यांची हेळसांड करून प्रमाणपत्राला ऊशिर लावत मनमानी कारभार करत असुन खाजगी रूग्णालयात सेवा देण्यात व्यस्त असतात कर्तव्य पार पाडण्यास कसुर केल्याबद्दल त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशा लेखी तक्रार केल्यानंतर त्याविषयी दैनिकात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर डाॅ.सुरेश साबळे जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड यांनी डाॅ.विजय कट्टे यांना कर्तव्याचे पालन करत नसल्याने तसेच रूग्णांना वेळेवर सेवा देत नसल्याचे स्पष्ट होत असून आपणास दिव्यांग तपासणी बोर्डावरून का कमी करण्यात येऊ नये तसेच आपल्या कामात सुधारणा करण्यात यावी नसता आपण महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल)नियम १९७९ मधिल नियम १० अंतर्गत शिस्तभंगाची कार्यवाही का प्रस्तावित करण्यात येऊ नये याचा खुलासा करण्याबाबत नोटीस काढली आहे. 

   डाॅ.विजय कट्टेंच्या तक्रारीचा ढीग मनमानी कारभार ;फायली घरी,कर्तव्यात कसूर:-डाॅ.गणेश ढवळे 
____
डाॅ.विजय कट्टे अस्थिरोगतज्ज्ञ दिव्यांग तपासणी बोर्ड यांच्या मनमानी कारभाराच्या अगदी दिव्यांगाच्या फायली घरी नेण्यासह आर्थिक लाभापोटी त्रुटी नसतानाही त्रुटी काढून हेळसांड करून प्रमाणपत्रात पुर्वीपेक्षा दिव्यांगाच्या प्रमाणपत्रातील टक्केवारी कमी करणे,अरेरावी करणं प्रमाणपत्राला ऊशिर करणे आणि स्वतःच्या खाजगी रूग्णालयात सेवा देण्यात व्यस्त असतात आदि तक्रारींचा ढीग असल्याचे बोलले जाते. 
       यापुर्वीसुद्धा डाॅ.विजय कट्टे यांच्या विरोधात दि.१७ नोव्हेंबर रोजी जिल्हारूग्णालयात धरणे आंदोलन करण्यात आले होते मात्र वरिष्ठांकडून पाठराखण करत कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. 

No comments:

Post a Comment