बीड (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील येळंब (घाट) येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत गेल्या वर्षभरापासून मनमानी कारभार सुरू आहे.
शाखाधिकारी आणि कॅशिअर वारंवार गैरहजर असतात तब्बल ८-८ दिवस शाखेतील कारभार ठप्प असतो. अधिकारी हजर असले तर शाखेच्या गेटवर तांत्रिक अडचणीमुळे कामकाज बंद असल्याचे फलक लावुन संपुर्ण काम ठप्प असते. अधिकारी आणि कर्मचारी वर्गाकडून वारंवार शेतकऱ्यांचा अवमान करुन बाहेर हाकलले जाते.
ग्राहक जास्त काही बोलला तर गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मनमानी आणि हुकुमशाही पध्दतीने सुरू असलेल्या कामकाजा विरोधात दि.२४ जुन २०२२ रोजी सकाळी १० वाजता शाखेसमोर आक्रोश ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे आणि युवा नेते अशोक काळकुटे यांनी दिली आहे.
असा मनमानी कारभार करणाऱ्या मुजोर शाखाधिकारी आणि कॅशिअर यांची तात्काळ बदली करून कामकाज सुरळीत सुरू करण्याची मागणी घेऊन हे आंदोलन होणार आहे.
यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री, कृषीमंत्री, विभागीय आयुक्त, बीड जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, तहसीलदार, नेकनुर पोलिस स्टेशन ला देण्यात आले आहे.
तरी या आंदोलनाला शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती राज्य कार्याध्यक्ष डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या सह युवा नेते अशोक काळकुटे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment