Saturday, June 18, 2022

नागरिकांना पिण्याचे गढुळ आणि अस्वछ पाणी जनतेच्या आरोग्याशी खेळतंय कोण ?

 

शेवगाव(प्रतिनीधी) शेवगांव शहरासह  तालुक्यातील 56 गावांच्या योजने अंतर्गत जायकवाडी धरणाच्या बँक वॉटरमधून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत शेवगांव पंचायत समिती जिल्हापरिषद अहमदनगर आणि ठेकेदार यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी आहे पण यात काहीतरी गडबड होत आहे.

 गेल्या काही दिसांपासून ग्रामीण भागातील आव्हाने आणि परिसरात कोंबड्यांची पीस आणि ईतर घाण नळावाटे येत आहे पाण्याचे निर्जंतुकीकर होतें की नाही हा एक गंभीर प्रश्न आहे पाणी शुद्धीकरणावर दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च कागदावर  केला जातो मग टी.सी.एल. वलॉरीन पावडर आणि तुरटी जलशुद्धीकरण केंद्रात वापरले जाणे अपेक्षित आहे पण तसे होताना दिसत नाही ग्रामपंच्यात पदाधीकारी नुसतेच नावाला आहेत.

  आज  दुपारी   पाणीपुरवठा नळ योजनेला सुटलेल्या पाण्यामध्ये वरीलप्रमाणे घाण कोंबडीची पिसे व दूषित पाणी आले असून  सरपंच ,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांनी  नागरिकांना दूषित पाणी पुरवठा करू नये  याबाबत नागरिकांनी  वारंवार पंचायत समिती शेवगांव कळवले आहे. यावर आपण कुठल्याही प्रकारची कारवाई  केलेली नाही  यां भागातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था करावी हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

No comments:

Post a Comment