पिंपरी चिंचवड (प्रतिनीधी) लखनौ येथील हत्याकांडाची चर्चा सुरु असतांनाच पिंपरी चिंचवड च्या भोसरी परिसरातून तशीच एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका अल्पवयीन मुलाने आईशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीचा निर्जनस्थळी नेऊन खून केला आहे. हत्येचा वेळी मुलगा नशेत असल्याचे समजत आहे
गेल्या काही दिवसांपासून पबजी हत्याकाडांची चर्चा सुरु आहे. आई आणि प्रॉपर्टी डिलर अंकलच्या भेटीचा राग, आईची मारहाण, आई आणि वडिलांचं भांडणं, या सगळ्याच्या रागातून एक मुलानं आपल्या आईचीच हत्या केली असल्याचं उघड झालं होतं. सुरुवातील पबजी खेळू न दिल्यानं आईची मुलानं गोळ्या घालून हत्या केल्याचं सांगितलं जातं होतं. मात्र नंतर करण्यात आलेल्या पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे होते गेले होते. बापाच्या उकसवण्यावरुन आणि आईच्या विरोधात मनात तयार झालेल्या द्वेषातूनच मुलानं आईची गोळ्या घालून हत्या केल्याचं नंतर समोर आलं होतं. ही घटना ताजी असतानाच आता पिंपरीतील हत्याकांडानं सगळेच हादरुन गेलेत
या हत्येमागचं कारणही हादरवून टाकणारं आहे. आपल्या आईसोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा राग मुलाला होता. त्यातूनच या मुलानं हत्येचा कट रचला. गेल्या पाच वर्षांपासून आईशी विवाहबाद्य संबंध मुलाला खटकत होते. अखेर मुलाने या व्यक्तीचा काटा काढला. या इसमाला एका निर्जनस्थळी नेऊन अल्पवयीन मुलाने त्याचा खून केला. पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या घटनेनं सगळेच हादरुन गेलेत. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव दीपक वाघमारे असं आहे. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून अधिक तपास केला जातोय
हत्या करण्यात आलेल्या दीपक वाघमारे आणि मारेकरी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या आईचे अनैतिक संबंध होते. मयत दीपक हा वडील आणि अल्पवयीन मुलगा घराबाहेर गेले, की आईला भेटायचा. ही बाब अल्पवयीन मुलाला खटकली होती. याचा राग मुलाच्या मनात खदखदत होता. त्यातूनच या मुलाननं दीपकची हत्या करण्याचा कट रचला
एका व्यक्तीकडे पैसे आणण्यासाठीचा बहाणा करत दीपकला अल्पवयीन मुलानं बोलावून घेतलं. त्यानंतर दीपकला हा मुलगा एका निर्जनस्थळी घेऊन गेला. तिथं त्यानं दीपकचा गळा चिरला आणि त्याचा खून केला. यानंतर मुलगा पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दीपका मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, अल्पवयीन मुलागा हत्येवेळी नशेत होता, अशीही माहिती समोर आली आहे. हा मुलगा एका किराणामालाच्या दुकानात डिलिव्हरी बॉयचं काम करत होता.
No comments:
Post a Comment