सोलापूरसह अन्य भागात पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढल्याने वाहनधारकांच्या चिंतेत भर पडली आहे. अलीकडे तर काही राज्यांमध्ये पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. याचाही नाहक त्रास ग्राहकांना सोसावा लागला. विविध राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला होता.
विशेष म्हणजे खासगी कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर ग्राहकांना इंधन मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. आता केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या खाजगी पंपांची ही मनमानी रोखण्यासाठी केंद्र सरकारने युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन (यूएसओ) ची व्याप्ती वाढविण्यासाठी निर्णय घेतला आहे.
यानुसार आता ग्राहकांसाठी इंधनाची उपलब्धता निश्चित करण्यात येणार आहे. जर सरकारी नियमांचे पालन न केल्यास संबंधितांचा परवाना रद्द होणार आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये काही पंपांवर पेट्रोलचा तुटवडा जाणवला. मागणी वाढल्यानंतर स्टॉक संपल्याच्या तक्रारी पुढे आल्या. त्यामुळेच केंद्राने यूएसओची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हा निर्णय पेट्रोलियम क्षेत्रातील सरकारी व खाजगी अशा दोन्ही कंपन्यांना लागू होणार आहे.
पूर्वी हा नियम फक्त उत्तर पूर्व राज्यांनाच लागू होता. पण आता यूएसओची व्याप्ती संपूर्ण देशभरात वाढविण्यात येणार आहे. या नव्या सरकारी नियमांनुसार पेट्रोल पंप विक्रेत्यांना पंप सुरू आणि बंद करण्यासाठी सरकारी नियमांचे पालन करावीच लागेल. इतकेच नव्हे तर सरकारच्यावतीने पेट्रोलपंप चालकांना पेट्रोल पंप सुरू आणि बंद करण्याची ठराविक वेळ देण्यात येईल. त्या वेळेनुसारच पंप सुरू आणि बंद करावे लागणार आहे.
No comments:
Post a Comment