परळी वै. तालुक्यात उष्णतेच्या तीव्रतेने काही दिवसापासुन तापमान वाढलेले असल्यामुळे आणि वातावरणातील बदलामुळे तालुक्यात नागरीकांना पाणीटंचाई सरख्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते.परंतु दिनांक ११ जुन २०२२ रोजी सायंकाळच्या वेळी पावसाने विजेच्या कडकडाटासह वरून राजाने मान्सुनची दमदार सुरवात केल्याने आणि परळी वै. शहर परिसरात आणि तालुक्यात हजेरी लावल्याने कित्येक दिवसापासुन उष्णतेमुळे हैराण असलेल्या नागरीकांना काही काळापुर्ती उकाड्यापासुन सुटका मिळाली असून परिसरात पाणीच पाणी झाल्याने वातावरण थंड झाले आहे. शेतीच्या मशागतीची कामे पुर्ण करून पेरणीच्या कामासाठी वरून राजाची वाट पाहणारा आणि लगबग करणारा शेतकरी वर्ग सुखावला असून शेतकरी राजासाठी पेरणीच्या कामासाठी रस्ता मोकळा झाला आहे. वादळवाऱ्या सह पडलेल्या या पावसामुळे परिसरातील उष्णता कमी झाली असून नागरीकांनी उष्णतेपासून मोकळा श्वास घेतला आहे. पडलेल्या पावसामुळे परिसारातील लोकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पहावयास मिळत आहे.
No comments:
Post a Comment