चौसाळा (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील चौसाळा येथील बसस्थानकाशेजारी अवैध धंदाचा सुळसुळाट सुरू असुन राजरोजपणे देशी दारूची विक्री होताना पाहायला मिळत आहे त्याच बरोबर हातभट्टी दारूची विक्री मोठया प्रमाणावर होत असुन या हातभट्टी दारूमुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले आहेत
बसस्थानका समोरच खुलेआमपणे हातभट्टी दारूची विक्री होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे
दारूबंदी विभाग व स्थानिक पोलीस प्रशासन नेमके करतय काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारताना दिसत आहेत.
या हातभट्टी दारूमुळे अनेक लोकांना पोटाचे विकार झाले आहेत
गोरगरीब लोकांच्या संसाराची राख रांगोळी होत असताना पोलीस प्रशासन फक्त बघायची भुमिका निभावत आहे
जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणाकडे लक्ष घालणार का ? असा प्रश्न गोरगरीब जनता विचारत आहे.
No comments:
Post a Comment