भाजपचे दिवंगत जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर पक्ष नेतृत्व अन्याय करीत असून त्यांना विधान परिषदेवर संधी दिली नाही. यामुळे केज तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. मुंडे यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस हेच त्यांना डावलत असल्याच्या रागातून केज तालुका भाजपचये तालुका अध्यक्ष भगवान केदार यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे गमचे गळ्यात घालून त्यांनी चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व्यक्त करीत आता तरी त्यांना सुबुद्दी मिळावी म्हणून संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केज येथील चिंचपूर हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करून भाजप पक्षाला व नेतृत्वाला सुबुद्धी मिळो अशी प्रार्थना केली आणि मुंडे भगिनीवर स्वपक्षातूनच होत असलेल्या उपेक्षामुळे सणसणीत चपराक लगावली आहे.
या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार, जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे, युवानेते विष्णू घुले, दत्ता धस, संभाजी गायकवाड, बालासाहेब राऊत, प्रकाश मुंडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.
Sunday, June 12, 2022
केजमध्ये देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना सुबुद्दी येवो म्हणुन भाजपाच्या कार्यकर्त्यांची हनुमानाला प्रार्थना.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment