केज (प्रतिनीधी) :- वडील दारू पितात म्हणून मुलाने दारूच्या नशेत वडिलांना मारहाण केली. त्यामुळे जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू झाला असल्याने सदोष मणूष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, युसुफवडगाव ता. केज येथे दि. १२ जून रविवार रोजी सायंकाळी ५:३० वा. च्या दरम्यान मल्हारी निवृती लगसकर याने स्वतः दारू पिऊन त्याचे वडील निवृती कोडिबा लगसकर वय (७० वर्ष) यास ते दारू पितात म्हणून टणक वस्तूने डाव्या पायाच्या नडगीवर मारहाण केली. या मारहानीमुळे त्याचे वडील निवृत्ती कोंडीबा लगसकर यांचा मृत्यू झाला.
मयताचा दुसरा मुलगा पोपट निवृत्ती लगसकर याच्या फिर्यादी वरून त्याचा
भाउ मल्हारी निवृती लगसकर याचे विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गु. र. नं. ८५/२०२२ भा. दं. वि. ३०४ नुसार सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख हे करीत आहेत.
Tuesday, June 14, 2022
दारू पितात म्हणून दारूच्या नशेत वडिलांना मारहाण .सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment