Sunday, June 12, 2022

चौसाळात मोकाट कुञ्यांच्या टोळीचा धुमाकूळ. हल्ल्यात शेतकऱ्याच्या चार शेळया जागीच ठार.


बीड (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील चौसाळा येथे मोकाट कुञ्यांनी हैदोस घातला असुन तीस ते चाळीस कुञ्यांचे टोळके भरदिवसा दिसेल त्या जनावरती तुटून पडत असुन काल अशीच घटना चौसाळा येथे घडली असुन चौसाळा येथील शेतकरी सुधाकर गुजांळ यांच्या चार शेळया कुञ्यांच्या हल्ल्यात जागीच ठार झाल्या असुन अंदाजे पन्नास हजार रुपयाच्या घरात नुकसान झाले.
 असल्याचे दिसुन येत असल्यामुळे तात्काळ या मोकाट कुञ्यांच्या बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतुन केली जात असुन एखादया मनुष्यावरती जर हे मोकाट कुञे तुटून पडले तर याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकातुन चर्चेला जात असुन तात्काळ या मोकाट कुञ्यांच्या बंदोबस्त प्रशासनाने करावा अन्यथा चौसाळा येथील नागरिक आंदोलनाच्या पाविञ्यात असल्याचे बोलले जात आहे

No comments:

Post a Comment