केंद्र सरकारने जाहीर केलेली अग्निवीर भरती प्रक्रिया संदर्भात आज तिन्ही दलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अग्निपथ योजना कोणत्याही परिस्थितीत रद्द केली जाणार नसून यापुढे आता या योजने अंतर्गतच तिन्ही सैन्य दलात भरती केली जाणार असल्याची मोठी घोषणा केली. तसेच प्रत्येक युवकाला भरती आधी हिंसा, तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. पोलीस व्हेरिफिकेशन हे शंभर टक्के सल्याशिवाय अग्निवीरांना सेवेत सहभागी होता येणार नसल्याचे तीनही सेना दलांच्या वतीने लेफ्टनंट जनरल अनिल पुरींनी सांगितले.
आज तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांच्या वतीने पत्रकार परीक्षा घेत केंद्र सरकारने जाहीर केलेली ‘अग्निपथ’ योजनेबाबत महत्वाची माहिती देण्यात आली. यावेळी अग्निपथ योजने अंतर्गत येत्या 24 जूनपासून वायू दलात भरती प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. तसेच भारतीय लष्कराकडूनही लवकरच भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना जारी केली जाईल. 2050 पर्यंत 50 टक्के लोकसंख्या ही 50 वर्षाच्या आतील असेल त्यामुळे लष्कराला जोश आणि होश असणाऱ्या युवकांची गरज असल्याचे पुरी म्हणाले.
No comments:
Post a Comment