Saturday, June 18, 2022

उदंडवडगाव येथील कला केंद्र घडलेल्या प्रकरणाची चौकशी आयपीएस पंकज कुमावत यांच्याकडे.


*-विवेक कुचेकर यांच्या मागणीची पोलीस अधीक्षक ठाकुर यांनी घेतली गंभीर दखल.
  
बीड (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील उदंडवडगाव येथील कला केंद्रात लैंगिक शोषण, मारहाण आणी १२ वर्षाच्या मुलीला डांबून ठेवल्याची तक्रार एका पिडीत महिलेने पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली होती त्यापूर्वी ही पिडीता तीन पोलीस ठाण्यात गेली होती पंरतु तिचे कुणीच ऐकुन घेतले नाही 
प्रसिद्धी माध्यमांसमोर हा प्रकार आल्यानंतर खळबळ उडाली होती 
पोलिस अधीक्षक कार्यालयातून एक पथक सोमवारी रात्री नेकनुर पोलीस ठाण्यात गेले होते .
त्याठिकाणी पिडीतेचा जवाब घेवुन एकाच आरोपीवर कलम ३२४,३२३,५०४,५०६ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु पिडीत महिलेने पोलिस अधीक्षकाकडे दिलेल्या तक्रारीत कलाकेद्रांतील एका भाभीसह दोघांची नावे आहेत माध्यमासमोर देखील पिडीतेने दोघांची नावे घेतलेली होते मग एकाच आरोपीवर गुन्हा का? १२ वर्षाची मुलगी डांबुन ठेवल्याची तक्रार असताना पोलीस प्रशासनाने तिला नेमके कोठुन आणले ? आणल्यानंतर  पिडीत महिलेच्या स्वाधीन केले माञ अपहरणाचे कलम का लावले नाही?लैंगिक शोषणाची तक्रार असतानाही त्याचा कोठे उल्लेख नाही? राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षाना या प्रकरणाची दखल घ्यावी लागते एवढे हे प्रकरण गंभीर असताना त्याला किरकोळ स्वरूप देण्यामागे नेकनुर पोलीसांची भुमिका संशयास्पद वाटत नाही का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित केला होता या प्रकरणाची गंभीर दखल घेत बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी या प्रकरणाची चौकशी केज पोलीस उपविभागीय अधिकारी पंकज कुमावत यांच्याकडे दिली आहे. कला केंद्रात बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे असल्याची तक्रार एका पिडीत महिलेनी दाखल केल्यानंतर पञकार आशोक काळकुटे हे बातमी संकलनासाठी नेकनुर पोलीस स्टेशन मध्ये दि.१३ जुन २०२२ रोजी सायंकाळी १० वाजता गेले असता संबधित प्रकरणातील भाभी शमीम बानो शहाबोद्दीन शेख हिने पोलीस स्टेशन परिसरातच बातमी न टाकण्याची धमकी देवुन अश्लील भाषेत शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी आरोपी सागर शहाबोद्दीन शेख व शेख समीर शेख अनिस यांनी दिली होती याची माहिती नेकनुर पोलीस स्टेशनला दिल्यानंतरही प्रकरण गांभीर्याने घेतले नव्हते यामध्ये दुसरया दिवशी अदखपाञ स्वरूपाचा गुन्हा नोंद करण्यात आला पंरतु पोलीस स्टेशनचे अधिकारी यांचे संबंध असल्याने आरोपीना मोठे सहकार्य मिळत असल्याचे दिसुन आले होते
जगदंबा कला केंद्राच्या नावावर अवैध वैश्या व्यवसाय जर होत असेल तर मग  नेकनुर पोलीस प्रशासन करतय काय ?  स्थानिक पोलीस प्रशासन हे प्रकरण दडपण्यासाठी तर प्रयत्न करत नाही ना ?असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी उपस्थित केला होता व 
जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून यातील मुख्य आरोपी कलाकेद्रं चालक भाभीवरती कायदेशीर कारवाई करून या कला केद्रांचा परवाना रद्द करण्यात यावा नसता लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी दिला होता या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी घेत संबधित प्रकरणाचा तपास कर्तव्यदक्ष पोलीस उपअधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे देण्याचे आदेश आज दिले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment