Friday, March 6, 2020

औरंगाबाद विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’.

औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामकरण करण्यात आले आहे. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, असे झाले आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक जवळ आली असून त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरवातीपासूनच औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करावे अशी मागणी शिवसेनेने लावून धरली होती आणि आज अखेर शिवसेनेच्या मागणीवर शिक्कामोर्तब झाला असून याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.

No comments:

Post a Comment