Tuesday, March 17, 2020

जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते यांची यशस्वी मध्यस्ती.

*वाशिम जिल्हातील पदाधिकार्‍यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोरील उपोषण मागे.

परळी-वैजनाथ-;(प्रतिनीधी)जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबन (भाऊ) गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम जिल्ह्यातील जनक्रांती सेनेच्या पदाधिकार्‍यांनी विविध मागण्यांसाठी सुरु केलेले उपोषण लेखी आश्वासना नंतर मागे घेतले.शेतकर्‍यांची फसवणुक करुन परसस्पर कर्ज पुर्नरगठण केल्या मुळे, विनंती अर्ज देवुनही कुठलेही चौकशी व कार्यवाही न झाल्यामुळे, भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी तसेच सेवा सहकारी सोसायटीतील पदाधिकारी यांच्या कारभाराची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्या बाबत, शेतकर्‍यांना महात्मा ज्योतीबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे उपाध्यक्ष मोहन भताने, अमोल देशमाने, चेतन बांगर, अमर भेंडेकर आदींसह जनक्रांती सेनेच्या असंख्य कार्यकर्ते व शेतकरी वाशिम जिल्हा धिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसले होते. उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले असुन आता शेतकर्‍यांना महात्म ज्योतीबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळे शेतकर्‍यांनी जनक्रांती सेनेच्या पदाधिकार्‍यांचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment