Monday, March 16, 2020

घरणीकर रोड वरील कचऱ्याने भरलेली नाली काढायला नगरपालिकेला कधी वेळ मिळणार?


* ब्लॉक झालेली नाली त्वरित काढावी अन्यथा आंदोलन करू;-नगरसेवक प्रा पवन मुंडे

परळी प्रतिनिधी: शहरातील प्रभाग 13 मधील घरणीकर रोड वरील नाली पूर्णपणे ब्लॉक झाल्याने नालीचे पाणी वाहून जात नसल्याने पाणी जाग्या वरच तुंबून बसले आहे त्या मुळे त्या परिसरात रोगराई निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्या मुळे तेथील स्थानिक लोकांचें जनजीवन विस्कळीत झाले आहे, तरी ती कचऱ्याने चोंदलेली नाली नगरपालिका प्रशासनाने त्वरित मोकळी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी दिला आहे.
अगोदरच कोरोना सारख्या असाध्य आजारांनी डोके वर काढलेले असतांना घरणीकर रोड येथील रहिवाशां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले  झाले आहे.घरणीकर रोड हा परिसर मुख्य मार्केट व  मोंढ्या च्या आजूबाजूचा परिसर असून त्या ठिकाणी विविध दवाखाने,व्यापाऱ्यांचे दुकाने व घरे आहेत व तो परिसर नेहमीच माणसांनी गजबजलेला असतो,नगरपालिका प्रशासनाला वारंवार विनंती करून सुद्धा नगरपालिका प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने  येत्या 8 दिवसात त्या तुंबलेल्या नालीतील गाळ काढून दूषित पाण्याला वाट मोकळी करून दयावी अन्यथा नगरपालिका प्रशासनाच्या च्या विरोधात हा प्रश्न सोडवण्यासा संदर्भात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा  भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी दिला आहे

No comments:

Post a Comment