परळी वैजनाथ( प्रतिनिधी) महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षापासून पुरोगामी पञकार संघाचे संपुर्ण जिल्हात अतिशय जोमाने कार्य चालू आहे .छञपती शिवाजी महाराज , राजर्षी शाहू महाराज , महात्मा ज्योतिबा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने कार्यरत पञकारितामध्ये एकवेगळा ठसा उमठविला आहे. ही महाराष्ट्रातील जनतेचे व गोर-गरिबांचे कार्य करणारी पञकार संघटना होय . या संघाचे संस्थापाक अध्यक्ष मा.विजय सुर्यवंशी साहेब यांच्या आदेशावरुन संपुर्ण बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई , केज, धारुर, माजलगांव , परळी-वैजनाथ , बीड, पाटोदा, आष्टी गेवराई या तालूक्याची कार्यकारणी जाहिर करण्यासाठी आदेशावरुन आज परळी पुरोगामी पञकार संघाची कार्यकारणी जाहिर करण्यात आली .
परळी पुरोगामी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी येथील मगर कॉम्प्लेस यांच्या कार्यलयात झालेल्या बैठकीत जाहीर झाली असून तालुका ध्यक्षपदी अमोल सुर्यवंशी
कार्याध्यक्षपदी प्रा. संदिपान मुंडे , तर शहरा ध्यक्षपदी बालाजी ढगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
मगर यांच्या कार्यलया मध्ये नवीन कार्यकारणी निवडीसाठी आज रोजी बैठक बोलावण्यात आली होती. विद्यमान बीड जिल्हाध्यक्ष प्रा. दशरथ रोडे जिल्हा सचिव प्रा. हनुमंत मगर.जिल्हा-उपाध्यक्ष ब्रम्हनाथ कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्षपदी अमोल सुर्यवंशी , शहराध्यक्षपदी बालाजी ढगे तर कार्याध्यक्षपदी प्रा. संदिपान मुंडे यांची बिनविरोध, (सर्वानुमते) निवड करण्यात आली.
No comments:
Post a Comment