Sunday, March 8, 2020

महातिवरणचा भोंगळ कारभाराने ग्राहक वैतागले .वीज बिलांची दुरुस्ती केल्यानंतरच सक्तीने वसुली करावी;-महादेव गित्ते.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 
महावितरणच्या भोंगळ कारभाराने वीज ग्राहक पुर्णपणे वैतागुन गेले आहेत. महावितरणने ग्राहकांना दिलेल्या बिलामध्ये अगोदर दुरुस्ती करुन नंतरच सक्तीने  वसुली करावी अन्यथा तीव्र आदोलन केले जाईल असा इशारा जनक्रांती सेनेचे महादेव गित्ते यांनी दिला आहे.
परळी येथील महावितरण कार्यालयाकडून वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले गेली आहेत. बिल कमी करण्यासाठी हजारो ग्राहक दररोज चकरा मारीत आहेत. मात्र अधिकारी आणि कर्मचारी गाढ झोपेत असल्याने त्यांना सामान्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शहरात आणि ग्रामिण भागात जवळपास 70 ते 80 टक्के वीज ग्राहकांना अवाढव्ये बिले दिले आहेत. यामुळे अगोदारच प्ररेशान असलेला सामान्य नागरिक आणि शेतकरी हैराण झाला आहे. बिल कमी करण्यासाठी  महावितरणच्या कार्यालयात चकरा मारुनही कुणीही दखल घ्याला तयार नाही. भ्रष्टाचाराने किडलेल्या या कार्यालयात सामान्यांना कोणताच थारा मिळत नाही. त्यातच सध्या कंपनीने सक्तीने  वीज बिल वसुली सुरु केली आहे. यामुळे वीज ग्राहक वैतागले असून संबधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी ग्राहकांच्या बिले आगोदर दुरुस्त करुन द्यावेत नंतरच सक्तीने  वसुली करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देऊन याची जबाबदारी महावितरणवर राहिल असे जनक्रांती सेनेचे महादेव गित्ते यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment