Wednesday, March 25, 2020

संचार बंदी च्या काळात बेघर लोकांना दिलासा. एक दिलासा फाउंडेशन चे मोफत अन्नछत्र.

परळी वैजनाथ  :- सध्या कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव कमी करण्या साठी आज पासून 21 दिवस लॉक डाऊन सुरू केले आहे.अश्या परिस्थि तीत तमाम जनतेने आपल्या घरांची दारे ही बंद केली आहे अश्यात ज्यांना घरे नाहीत त्यांच्या साठी मंदिराच्या पायऱ्याच सहारा असतात मात्रअध्या देऊळ बंद असल्यामुळे या बेसहारा लोकांना जगण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आणि अश्या बिकट परिस्थितीत एक दिलासा फाउंडेशन च्या वतीने या बेसहारा लोकांचा सहारा बनून समोर आले आणि या लोकांना आज पासून 21 दिवस दोन वेळचे जेवण मोफत दिले जानार आहे.
एक दिलासा फाउंडे शनच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.असे म्हणले तरी काही वावगे ठरणार नाही.
या कार्याची प्रेरणा घेऊन ज्या ज्या ठिकाणी अश्या बेसहारा लोकांना अनछत्र पुरवले तर कोरोनाला हद्दपार करीत आपण या ही लोकांचे प्राण निश्चित वाचवू शकू.आशा उद्देशाने अनेक सेवा भावी संस्थाने समोर येण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment