बीडः- ( प्रतिनीधी )बीड जिल्ह्यात व्यापाऱ्यांना हैराण केलेला अन्न औषध प्रशासन विभागाचा सहाय्यक आयुक्त कृष्णा दाभाडे लाचेच्या जाळयात अडकला. गुरुवारी सकाळी त्याला ३५ हजाराची लाच घेताना एसीबीने पकडले. त्याच्यासोबत एका खाजगी इसमालाही अटक करण्यात आली आहे.
अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दाभाडे याच्याबद्दल जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या मोठ्या तक्रारी होत्या. गुरुवारी सकाळी ए सी बी चे बाळकृष्ण हनपुडे यांच्या पथकाने सापळा रचला आणि स्वतःच्या कार्यालयातच एका दलाला च्या माध्यमातून ३५ हजाराची लाच घेताना कृष्णा दाभाडेला रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाई नंतर व्यापाऱ्यां मध्ये आनंद व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment