Friday, March 13, 2020

शिवसेना कोरोना आजाराबाबत जनजागृती करणार-भोजराज पालीवाल


*भवानीनगर येथील संपर्क कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी*

*परळी (प्रतिनिधी)*

कोरोना आजाराने जगाच्या पाठीवर चांगलीच खळबळ उडवली असून आपल्याकडे दुर्देवाने 59 रूग्ण सापडले आहेत. यापुढे हा आजार वाढू नये यासाठी शिवसेनेच्या वतिने माहिती पत्रकाद्वारे जनजागृती करणार असल्याची घोषणा शिवसेनेचे मा.शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांनी केली. संपर्क कार्यालयात आज छत्रपती शिवाजी महाराज यंाची जयंती  आज गुरूवार दि.12 मार्च रोजी  शिवसेनेचे मा.शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्या भवानीनगर येथील संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला भोजराज पालीवाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जेष्ठ शिवसैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. 
यावेळी बोलतांना भोजराज पालीवाल यांनी सांगितले की, देशात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असून केवळ गैरसमजामुळे हा आजार वाढत असतांना नागरिकांनाही काळजी घ्यावी लागत आहे. हा आजार कसा टाळावा ? यावर काय उपाययोजना कराव्यात ? तसेच काय काळजी घ्यावी याबाबत माहिती असणारे पत्रक संपूर्ण परळी शहरात विविध शासकिय कार्यालये, गर्दीची ठिकाणे व घरोघरी देणार असल्याचे भोजराज पालीवाल यांनी सांगितले. दरम्यान जेष्ठ शिवसैनिक हा आमच्यासाठी मार्गदर्शक असून त्यांच्या माध्यमातून शिवसेना व शिवसैनिक म्हणून काम करतांना आम्हाला मोठा आधार मिळेल असे भोजराज पालीवाल यांनी सांगितले. 
यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते भाऊराव  भोयटे, नारायण सातपुते,  संजय कुकडे , रवींद्र परदेशी, सचिन स्वामी.प्रकाश साळुंके, बाळासाहेब देशमुख, विशाल सुगरे, शिवाजी दराडे, बाळासाहेब गवळी, हरीश पालीवाल, आनंद पालीवाल, विजय जाधव, गणेश गवारे, अण्णा कुंभार यांच्यासह शिवसैनिक, शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment